Asia Cup 2023, India vs Pakistan : आशिया कप 2023 मधील सुपर-4 चा थरार शिगेला पोहोचलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना पावसात वाहून गेला. पण सुपर-4 मध्ये दुसऱ्यांदा सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
ADVERTISEMENT
एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यामुळे सुपर-4 च्या गुणतालिकेत उत्कंठा वाढली आहे. पण यासोबतच चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध हरवून भारत अंतिम फेरीत पोहोचणार?
क्रिकेट चाहत्यांना आता आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामनाही पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये ही टक्कर होऊ शकते. हा विजेतेपदाचा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाईल.
हेही वाचा >> विराट-राहुलचा शतकी धमाका, पाकिस्तान विरुद्धच्य सामन्यात विराट ठरला वेगवान फलंदाज
भारतीय संघाला आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 मध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. असे झाल्यास सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. दोन्ही सामन्यांचा निकाल सारखाच लागला तर अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित होईल.
सुपर-4 ची गुण तालिका
भारत – 1 सामना – 2 गुण, 4.560 नेट रनरेट
श्रीलंका – 1 सामना – 2 गुण, 0.420 नेट रनरेट
पाकिस्तान – 2 सामने – 2 गुण, -1.892 नेट रनरेट
बांगलादेश – 2 सामने – 0 गुण, -0.749 नेट रनरेट
टीम इंडिया आणखी दोन सामने खेळणार
पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाला सुपर-4 फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. या फेरीतील संघाचा दुसरा सामना आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. यानंतर तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध (15 सप्टेंबर) होईल. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार… समीकरण समजून घ्या
1) भारतीय संघाने श्रीलंकेला हरवले तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. यानंतर टीम इंडियाला बांगलादेशसोबतही सामना खेळावा लागणार आहे, जो औपचारिक असणार आहे.
2) पाकिस्तानला शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. बाबर आझमच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर त्यांचा अंतिम फेरीत भारताशी सामना होईल.
हेही वाचा >> Maratha Reservation : असा आहे मराठा आरक्षणाचा इतिहास?
3) पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर तर दोन्ही संघांचे 3-3 गुण असतील. त्यानंतर नेट रन रेट महत्त्वाचं असेल. या आधारावर श्रीलंका पात्र ठरेल, कारण त्यांचा नेट रनरेट चांगला आहे.
4) पुढच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला हरवले तर टीम इंडियाला बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत पोहोचण्याची पूर्ण आशा असेल. पण अंतिम फेरीसाठी पाकिस्तानला त्यांच्या पुढच्या सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल.
ADVERTISEMENT