मराठमोळा रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

मुंबई तक

• 11:35 AM • 13 May 2021

मुळचा मुंबईकर आणि टीम इंडियाचा माजी स्पिनर रमेश पोवारची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने रमेश पोवारच्या नावाची बीसीसीआयला शिफारस केली आहे. बीसीसीआयनेही सल्लागार समितीची शिफारस मान्य केली असून रमेश पोवारच्या नावाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी घोषणा केली आहे. सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि […]

Mumbaitak
follow google news

मुळचा मुंबईकर आणि टीम इंडियाचा माजी स्पिनर रमेश पोवारची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने रमेश पोवारच्या नावाची बीसीसीआयला शिफारस केली आहे. बीसीसीआयनेही सल्लागार समितीची शिफारस मान्य केली असून रमेश पोवारच्या नावाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंग यांच्या समितीने रमेश पोवारच्या नावाची शिफारस केली होती. महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ३५ अर्ज आले होते. त्यापैकी सल्लागार समितीने ८ अर्ज निश्चीत केले आहेत. १३ एप्रिल रोजी बीसीसीआयने महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी रमेश पोवार भारतीय महिला संघाला मार्गदर्शन करणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रमेश पोवारने २ कसोटी आणि ३१ वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. रमेश पोवारच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने नुकताच विजय हजारे करंडक जिंकला होता.

भारतीय महिला संघाचे सध्याचे प्रशिक्षक रमण यांच्याकडे २०१८ मध्ये महिला संघाची जबाबदारी आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघ २०२० मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहचला होता. परंतू या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नवीन वर्षात मार्च महिन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर लिमीटेड ओव्हर सिरीज खेळली, परंतू यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे रमेश पोवारच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp