Champions Trophy 2025 : हरभजन सिंह पाकिस्तानवर भडकला, असं घडलं तरी काय?

मुंबई तक

26 Jul 2024 (अपडेटेड: 26 Jul 2024, 04:09 PM)

Champions Trophy 2025 : बीसीसीआयने टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानात (Pakistan) पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

champions trophy 2025 harbhajan singh angree on pakistan bcci refused to send team India pakistan cricket board

पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 ला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे.

point

या स्पर्धेसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात जावे लागणार आहे.

point

बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला

Harbhajan Singh Reaction On Champions Trophy 2025 : पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 ला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात जावे लागणार आहे. मात्र बीसीसीआयने टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानात (Pakistan) पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात टीम इंडियाचा माजी फिरकीपट्टू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) चॅम्पियन्स ट्रॉफीवरून पाकिस्तानला सुनावले आहे. (champions trophy 2025 harbhajan singh angree on pakistan bcci refused to send team India pakistan cricket board) 

हे वाचलं का?

हरभजन सिंहने एका चॅनलला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत हरभजन सिंहने चॅम्पियन्स ट्रॉफीवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताने पाकिस्तानात का जावं? याबाबत मला कुणी उत्तर द्यावं, असं हरभजन सिंह म्हणाला आहे. तिकडे सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे.दररोज तिकडे कोणत्या ना कोणत्या घटना घडत असतात. त्यामुळे पाकिस्तानात जाणं मला नाही वाटतं सुरक्षित आहे, असे हरभजन सिंह म्हणाला आहे. बीसीसीआयने घेतलेली भूमिका एकदम योग्य आहे आणि खेळाडूंच्या सुरक्षेपुढे काहीच नाही आहे. त्यामुळे बीसीसीआयने घेतलेली भूमिका योग्य असून त्याचे मी समर्थन करतो, असे देखील हरभजन सिंह म्हणाला आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ना शिंदे सरकारचं आणखी मोठं गिफ्ट, काय मिळणार मोफत?

पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास भारत सरकार परवानगी देत नसल्याचे कारण देतं बीसीसीआयने नकार दिला आहे. याउलट बीसीसीआयने हायब्रीड पद्धतीने स्पर्धा खेळवण्याचे सुचवले होते. यासाठी दुबई आणि श्रीलंका या दोन ठिकाणचा प्रस्ताव दिला होता. मात्र तरीही भारताने पाकिस्तानात खेळण्यासाठी यावं अशी भूमिका पीसीबीने घेतला आहे. या संदर्भात कोलंबोत पार पडलेल्या दोन दिवसांच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. आता आयसीसीने भारताचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा,अशी मागणी पाकिस्तान बोर्डाने केली आहे. 

स्पर्धेचं ड्राफ्ट शेड्यूल 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या स्पर्धेतील 15 सामन्यांचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) पाठवले आहे. यामध्ये भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानसह आठ संघ सहभागी होणार आहेत. या आठ संघांमध्ये एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. कराची, रावळपिंडी आणि लाहोर या तीन ठिकाणी आठ संघांची ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पीसीबीने आयसीसीला सादर केलेल्या वेळापत्रकात सुरक्षेच्या कारणास्तव भारताचे सामने लाहोरमध्येच ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: शेवटच्या तारखेआधीच महिलांना मिळणार 3000 रुपये, नेमके कसे?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील पहिल्या आठ संघांचा समावेश असेल. आठ संघ चारच्या दोन गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह यजमान पाकिस्तान अ गटात आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

    follow whatsapp