ऑस्ट्रेलियाचे खेळाडू IPL 2021 च्या उर्वरित हंगामात सहभागी होणार, ऑस्ट्रेलियन बोर्डाचा हिरवा कंदील

मुंबई तक

• 09:40 AM • 15 Aug 2021

१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने परवानगी दिली आहे. टी-२० क्रिकेट वर्ल्डकपआधी आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवला जाणार असल्यामुळे सर्व परदेशी खेळाडू सराव व्हावा यासाठी आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. यंदा आयपीएलचा उर्वरित हंगाम आणि टी-२० वर्ल्डकप युएईत आयोजित करण्यात आला आहे. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता […]

Mumbaitak
follow google news

१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने परवानगी दिली आहे. टी-२० क्रिकेट वर्ल्डकपआधी आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवला जाणार असल्यामुळे सर्व परदेशी खेळाडू सराव व्हावा यासाठी आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. यंदा आयपीएलचा उर्वरित हंगाम आणि टी-२० वर्ल्डकप युएईत आयोजित करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने दोन्ही स्पर्धांचं आयोजन युएईत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मे महिन्यात भारतात आयपीएलचा हंगाम खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थगित करावा लागला होता. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांना मालदीवमार्गे ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आलं होतं. बीसीसीआयने या सर्वांसाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय केली होती. आयपीएल मध्यावधीत स्थगित करावी लागली असली तरीही ही स्पर्धा नंतर खेळवली जाईल हे बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं.

IPL in UAE : Corona ला दूर ठेवण्यासाठी BCCI ची जय्यत तयारी, १४ बायो सिक्युअर बबल तयार करणार

ज्यानंतर बीसीसीआयने उर्वरित १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत उर्वरित ३६ सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती. परंतू ही मालिका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

भारतात पार पडलेल्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे सात खेळाडू सहभागी झाले होते. ज्यात डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन आणि डॅनिअल सम्स यांचा समावेश होता. याव्यतिरीक्त जोश हेजलवूड, रायले मेर्डीथ, डॅन ख्रिश्चन, मोइजेस हेन्रिकेज, मिचेल मार्श, जेसन बेहरनडॉर्फ, झॅम्पा, अँड्रू टाय, कुल्टर-नाईल, ख्रिस लिन, बेन कटींग, जोश फिलीप हे खेळाडू देखील उर्वरित हंगामात खेळू शकणार आहेत.

IPL 2021 : BCCI कडून सामन्यादरम्यान खेळाडूंसाठीही कठोर नियम

    follow whatsapp