ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलिया क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल याने भारतीय वंशाच्या विनी रमन हिच्याशी 18 मार्च रोजी लग्न केलं आहे.
सुरुवातीला हे लग्न ख्रिश्चन पद्धतीने झालं. आता त्यांनी तामिळ परंपरेनुसार लग्न केलं आहे
भारतीय परंपरेनुसार जो लग्न सोहळा पार पडला त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ग्लेन मॅक्सवेलने यावेळी अगदी नाचत-नाचत विनीला वरमाला घातली आहे.
हा संपूर्ण लग्न सोहळा दोघांनी खूपच एन्जॉय केला.
मॅक्सवेल हा पारंपारिक भारतीय नवरदेवासारखाच शेरवानीमध्ये सजला होता.
मॅक्सवेल आणि विनी हे दोघेही मागील अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत होते. 2020 मध्ये त्यांचा साखरपुडा देखील झाला होता.
मात्र, कोरोना संकटामुळे त्यांनी आपलं लग्न पुढे ढकललं होतं. अखेर आता मॅक्सवेल लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
या दाम्पत्याच्या लग्नाचा खुलासा हा विनी रमन हिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळेच झाला आहे.
ADVERTISEMENT