कोरोना महामारीमुळे लॉकडाउन काळात ठप्प झालेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट भारतात पुन्हा एकदा सुरु होत आहे. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट मॅच सिरीजला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. जो रुट आपली १०० वी टेस्ट मॅच खेळत असल्यामुळे या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान टीम इंडियाने पहिल्या टेस्ट मॅचसाठी शाहबाज नदीम, वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन आश्विन या तीन स्पिनर्सना संघात स्थान दिलंय.
ADVERTISEMENT
रोरी बर्न्स आणि डॉम सिबले यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ रन्सची पार्टनरशीप करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. पहिल्या सेशनच्या सुरुवातीला भारतीय बॉलर्सना बॅकफूटवर ढकलण्यात इंग्लंडचे बॅट्समन यशस्वी.
रोरी बर्न्स आणि डॅन लॉरेन्स अनुक्रमे आश्विन आणि बुमराहच्या बॉलिंगवर माघारी. पहिल्या सेशनच्या अखेरीस भारताचं दमदार पुनरागमन
इंग्लंडच्या बॅट्समनची भारतीय बॉलर्सना चांगलंच झुंजवलं
जो रुट आणि डॉम सिबले यांनी लंच सेशननंतरही सावध खेळ करत टीम इंडियाच्या बॉलर्सचा नेटाने सामना केला. भारतीय बॉलर्सना बॅकफूटवर ढकलण्यात इंग्लंडला दुसऱ्या सेशनमध्येही यश
पहिल्या सेशनमध्ये आश्वासक सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या सेशनवर इंग्लंडच्या प्लेअर्सने वर्चस्व राखलं. डॉम सिबलेची हाफ सेंच्युरी आणि आणि जो रुटने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर इंग्लंड दुसऱ्या सेशनपर्यंत २ आऊट १४०
डोम सिबले आणि कॅप्टन जो रुट यांच्याकडून भारतीय बॉलर्सची धुलाई. तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी. इंग्लंडने ओलांडला द्विशतकी टप्पा
ADVERTISEMENT