राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्यात संघर्षाचं वातावरण तयार झालेलं आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध उघडलेला मोर्चा यामुळे दररोज आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या परिस्थितीवर पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना प्रश्न विचारला होता. परंतू यावर भाष्य न करता पवारांनी थेट क्रिकेट आणि ललित मोदींवर भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांच्या सन्मान सोहळ्यात शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना पवारांनी ललित मोदींचं कौतुक केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, ‘ललित मोदी यांनी खेळात जे योगदान दिलं त्याबाबत मी बोललो. मी बाकी काही बोललो नाही. त्याचा काही माझा विषय नव्हता इथे. पण ही गोष्ट खरी आहे की आज जगात आयपीएलचं नाव झालं आहे. महाराष्ट्राचा आपला एकच गेम असा आहे जो महाराष्ट्रातून जगात गेलाय आणि जगातील खेळाडू महाराष्ट्रात येत आहेत. त्या आयपीएलच्या निर्मितीमध्ये मी अध्यक्ष असताना जो निर्णय घेतला त्याच्या उभारणीमध्ये ललित मोदी यांचं योगदान होतं ही वस्तुस्थिती आहे’, असं पवार म्हणाले.
14 टी-20, 3 वन-डे आणि 4 टेस्ट मॅच, BCCI कडून 2021-22 च्या हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर
दरम्यान शरद पवारांनी ललित मोदींच्या योगदानाबद्दल भाष्य केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा उत्तरार्ध युएईत सुरु आहे.
आयपीएल यशस्वी करणाऱ्या ललित मोदींनी आयपीएलचा कारभार मनमानीपणे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. संघमालकांना आपल्या मनाप्रमाणे वागण्यास धमकावलं आणि बीसीसीआयचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारे निर्णय मोदींनी घेतले. या सगळ्या आरोपांमध्ये ललित मोदी दोषी असल्याचंही सिद्ध झालं. विशेष समितीनं सादर केलेल्या १३३ पानांच्या अहवालात हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयनं आजीवन बंदी घातली.
चंदू बोर्डे यांचा सन्मान –
‘क्रिकेटच्या क्षेत्रात ज्यांची अतिशय चांगली कामगिरी केली. खुपदा जोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळत असते तोपर्यंत लोकांच्या तोंडावर त्यांचं नाव असतं. मात्र, त्याचं करिअर संपल्यानंतर त्या खेळाडूकडे दुर्दैवानं पाहिलं जात नाही. पण मला अतिशय आनंद आहे की पुणेकरांनी चंदू बोर्डे यांचं क्रिकेटमध्ये जे योगदान आहे त्यांची नोंद घेऊन, त्याची आठवण ठेवून आज त्यांचा सन्मान केला. याच पद्धतीचा दृष्टीकोन ज्यांनी कुठल्याही खेळात योगदान दिलं त्याच्याबद्दल दाखवला तर नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल. भारताचं नावलौकिक या क्षेत्रात वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे’, असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.
भारतीय क्रिकेटपटूंचं होणार Increament, BCCI कडून मॅच फी मध्ये वाढ
ADVERTISEMENT