ना कोहली ना सूर्यकुमार… एबी डिव्हिलियर्सने सांगितला T20तील बेस्ट खेळाडू

मुंबई तक

• 08:08 AM • 07 Mar 2023

AB de Villiers has revealed the best T20 player : आरसीबीचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलीयर्स मिस्टर ३६० म्हणून क्रिकेट वर्तुळात ओळखला जातो. त्याच्या बॅटींगच संपुर्ण क्रिकेट विश्व दिवाने आहे. मात्र त्याने आता निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर आता त्याने टी२० तल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे. आता टी२० तलं सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हटलं तर अनेकांच्या तोंडावर […]

Mumbaitak
follow google news

AB de Villiers has revealed the best T20 player : आरसीबीचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलीयर्स मिस्टर ३६० म्हणून क्रिकेट वर्तुळात ओळखला जातो. त्याच्या बॅटींगच संपुर्ण क्रिकेट विश्व दिवाने आहे. मात्र त्याने आता निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर आता त्याने टी२० तल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे. आता टी२० तलं सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हटलं तर अनेकांच्या तोंडावर विराट कोहली आणि टीम इंडियाचा मिस्टर ३६० सुर्यकुमार यादवचे नाव सहाजिक येते. मात्र या दोघा खेळाडूंना वगळून त्याने तिसऱ्या एका खेळाडूचे नाव घेतले आहे? हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात. (former rcb star player ab de villiers reveals his greatest player all the time)

हे वाचलं का?

WPL : RCB चा सलग दुसरा पराभव, स्मृती मंधाना भडकली, ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार

कोण आहे हा खेळाडू?

एबी डिविलियर्सने आपल्या देशासाठी आणि आरसीबीसाठी खुप चांगल्या धावा केल्या आहेत. त्याच्या अनेक इनिंग्स प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. टी२० तला तो स्वत: एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मिस्टर ३६० म्हणुन सर्वप्रथम त्याला क्रिकेट वर्तुळात ओळखले जायचे. याच दिग्ग्ज खेळाडूने आता टी२०तल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे. डिविलियर्सने त्याच्या संघातील सहकारी विराट कोहली, ख्रिस गेल नव्हे तर दुसऱ्याच एका खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे. या खेळाडूचे नाव राशीद खान आहे. राशीद खान हा ऑस्ट्रेलियाचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे.

मला राशीद खान टी२० तला सर्वोत्कृष्ट खेळाडू वाटतो. कारण राशीद बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही फॉरमॅटमध्ये कमालिची कामगिरी करतो. राशीद खान मैदानावर कमालिचा खेळाडू आहे. त्याचे हृद्य वाघासारख आहे. त्याला नेहमी जिंकायचे असते, म्हणूनच तो मैदानावर सर्वांना कठीण टक्कर देत असतो. म्हणूनच तो टी२० तला सर्वांत महान खेळाडू आहे, असे डिविलियर्सने सुपरस्पोर्टसची बातचीत करताना सांगितले आहे.

WPL Kiran Navgire: सोलापूरच्या पोरीनं बॅटवर लिहलं धोनीचं नाव, ठोकलं अर्धशतक

टी२० त सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू

राशीद खानने २०१५ साली डेब्यू केला होता. तेव्हापासून हा खेळाडू क्रिकेट वर्तुळात कमाल करतोय. २४ वर्षाचा हा खेळाडू टी२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडु बनलाय. तर पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्रावो आहे. राशीद खानने आतापर्यंत ३८२ सामन्यात ५१४ विकेट घेतल्या आहेत. राशीद हा अफगाणिस्तानचा अव्वल नंबरचा खेळाडू आहे.

Ind vs Aus : विराट कोहली, चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचं कसं वाढवलं टेन्शन?

दरम्यान एबी डिविलियर्सबद्दल बोलायच झालं तर तो टी २० क्रिकेटमध्ये सर्वांत स्फोटक फलंदाज आहे. नुकतीच त्याने आरसीबीच्या मॅनेजमेंटची भेट घेतली होती. त्याने निवृत्ती जाहीर केल्याने तो आता आरसीबीच्या फ्रेंचाईजीमध्ये सामील होऊ शकतात. दरम्यान अद्याप आयपीएल सुरु व्हायला साधारण एक महिना बाकी आहे. या स्पर्धेची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.

    follow whatsapp