Ind vs Aus : आजपासून चौथ्या कसोटीला सुरवात; अशी असेल भारताची प्लेयिंग 11

मुंबई तक

• 10:19 PM • 08 Mar 2023

Ahmadabad Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (9 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium ) खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा आहे. या सामन्यात संघ जिंकला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम […]

Mumbaitak
follow google news

Ahmadabad Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (9 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium ) खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा आहे. या सामन्यात संघ जिंकला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीतही पोहोचेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामना सुरू होईल. Fourth Test starts today; This will be India’s playing 11

हे वाचलं का?

प्लेइंग-11 मध्ये बदल जवळपास निश्चित आहे

अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग-11कडेही क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल होताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलं जाईल, तो अनुभवी उमेश यादवसह नव्या चेंडूची जबाबदारी सांभाळेल. मोहम्मद शमी खेळल्यास मोहम्मद सिराजला बाहेर बसावे लागेल.

अक्षर पटेलही बाहेर बसणार का?

भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे या सामन्यात संघात अतिरिक्त फलंदाज ठेवण्याचीही चर्चा आहे, पण खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्यास 20 विकेट घेण्यासाठी पाच विशेषज्ञ गोलंदाजांची गरज भासेल. अक्षर पटेलने या मालिकेत आपल्या फलंदाजीने छाप पाडली असली तरी गोलंदाजीत तो केवळ एकच बळी घेऊ शकला आहे. यष्टिरक्षक केएस भरतलाही आतापर्यंत फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही, पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या विभागात कोणत्याही बदलाच्या बाजूने असल्याचे दिसत नाही.

नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार

भारतीय संघाला नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट रसिकांचा मोठा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे आणि पहिल्या दिवशी एक लाख प्रेक्षक पोहोचतील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवसाच्या खेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज देखील उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदी आणि अँथनी अल्बानीज सकाळी 8.30 वाजता स्टेडियमवर पोहोचणार आहेत. यादरम्यान दोन्ही दिग्गज नेते भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भेटतील तसेच खास रथातून स्टेडियमचा फेरफटका मारतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आणि अल्बानीज मॅचदरम्यान कॉमेंट्रीही करू शकतात.

Ind Vs Aus : चौथ्या कसोटीत या स्टार गोलंदाजांचा होऊ शकतो संघात समावेश

कोहली-पुजारा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

या सामन्यात कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या मालिकेत विराट कोहलीने आतापर्यंत 111 धावा केल्या आहेत तर चेतेश्वर पुजाराने 98 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून 207 धावा निघाल्या आहेत. भारताने प्रथम फलंदाजी केल्यास सुरुवातीचे सत्र खूप महत्त्वाचे असेल. इंदूर कसोटी सामन्यात भारताची पहिल्याच सत्रात गडबड झाली आणि त्यानंतर सामन्यात पुनरागमन करणे कठीण झाले.

ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे झाले तर ते ऑफस्पिनर टॉड मर्फीला वगळून स्कॉट बोलंड किंवा लान्स मॉरिसला संधी देऊ शकतात. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आधीच जागा निश्चित केली आहे आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ हा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.

Ind vs Aus : विराट कोहली, चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचं कसं वाढवलं टेन्शन?

भारताचे संभाव्य प्लेयिंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेयिंग-11: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनमन.

Ind Vs Aus : अहमदाबाद कसोटी सामना पंतप्रधान मोदीही बघायला जाणार, कारण…

    follow whatsapp