MS Dhoni CSK Captaincy in IPL: माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत आहे. अशा स्थितीत धोनी पुढच्या हंगामातही खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात घोळत होता.
ADVERTISEMENT
धोनीच राहणार कर्णधार
धोनी पुढच्या 2023 च्या आयपीएल हंगामात खेळला तरीही तो चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा कर्णधार असेल की नाही? मात्र आता याचा खुलासा झाला आहे. चेन्नई फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे की, पुढील हंगामातही फक्त धोनीच कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी आज तकला सांगितले की, ‘महेंद्रसिंग धोनी पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा कर्णधार असेल. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
गेल्या हंगामात जडेजाकडे सोपवली होती कॅप्टन्सी
आयपीएल 2008 पासून सुरू झाले आहे. धोनी पहिल्या सत्रापासून चेन्नई संघाचे नेतृत्व करत आहे आणि त्याने संघाला सर्वाधिक 4 वेळा विजेतेपदही मिळवून दिले आहे. शेवटच्या म्हणजे आयपीएल 2022 च्या मोसमात चेन्नई फ्रँचायझीने थोडा बदल केला होता. त्याने प्रथमच धोनीला कर्णधारपदावरून हटवले. धोनीने स्वत: रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले. मात्र संघाची कामगिरी खराब झाली.
खराब कामगिरीनंतर जडेजाने मध्येच कर्णधारपद सोडले
जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने पहिल्या 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकले होते. यासोबतच जडेजाच्या कामगिरीवरही परिणाम होत होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत तो फ्लॉप दिसत होता. त्यानंतर स्वतः जडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवले. त्यानंतर चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. अशा परिस्थितीत 41 वर्षांचा धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार की नाही, अशी अटकळ बांधली जात होती. तो खेळला तर तो कर्णधार होईल की नाही? असे मानले जात होते की पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा नवा कर्णधार उदयास येऊ शकतो, जेणेकरून धोनीनंतर त्याचा उत्तराधिकारी भविष्यात तयार होऊ शकेल. पण आता फक्त धोनीच कमान सांभाळताना दिसणार असल्याचे फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे.
चेन्नईने सर्वाधिक रकमेत जडेजाला कायम ठेवले होते
चेन्नई फ्रँचायझीने 4 खेळाडूंना कायम ठेवले होते. त्यांनी सर्वाधिक रक्कम अष्टपैलू रवींद्र जडेजावर खर्च केली, त्याला 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले होते. या फ्रँचायझीने कर्णधार एमएस धोनीला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आणि भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड यांना 8-8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ:
कायम ठेवलेल्यांची यादी– रवींद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी), ऋतुराज गायकवाड (8 कोटी), मोईन अली (6 कोटी).
फलंदाज/विकेटकीपर– रॉबिन उथप्पा (2 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), डेव्हॉन कॉनवे (1 कोटी), सुभ्रांशु सेनापती (20 लाख), हरी निशांत (20 लाख), एन जगदीशन (20 लाख).
अष्टपैलू खेळाडू– ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), राजवर्धन हेंगरगेकर (1.50 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (0.50 कोटी), मिचेल सँटनर (1.9 कोटी), प्रशांत सोलंकी (1.20 कोटी), ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी) Cr), भगत वर्मा (20 लाख).
गोलंदाज– दीपक चहर (14 कोटी), के.एम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख), महिश तिक्ष्णा (70 लाख), सिमरजीत सिंग (20 लाख), अॅडम मिलने (1.90 कोटी), मुकेश चौधरी (20 लाख) .
ADVERTISEMENT