– पारस दामा, मुंबई प्रतिनिधी
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला यंदा मुंबई आणि पुणे शहरात सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची भिती लक्षात घेता खेळाडू आणि स्पर्धेशी निगडीत अन्य लोकांना जास्त प्रवास करायला लागू नये यासाठी यंदाच्या स्पर्धे मुंबई आणि पुणे या दोन शहरांतील ४ मैदानांवर खेळवल्या जात आहेत. यात आयपीएलने आणखी एक भर घातली असून मैदानांची काळजी घेणाऱ्या Groundman ना ही आता पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला २५ टक्के आणि त्यानंतर ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने खेळवले जात आहेत. मैदानांची काळजी घेणाऱ्या Groundman ना यंददा कॅडबरी कंपनीने गिफ्ट दिलं असून त्यांची राहण्याची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केली आहे. इतकच नव्हे तर त्यांना प्रसिद्ध सेलिब्रेटी डिजायनर मसाबा ने डिजाईन केलेल्या खास जर्सीही देण्यात आल्या आहेत. याचसोबत त्यांना मैदानातून हॉटेलवर जायला-यायला वेगळ्या बसची सोय आणि सोबतच हॉटेलमध्ये स्वतंत्र जेवणाची सोय करण्यात आली आहे.
मैदानांची काळजी घेणाऱ्या या Groundman साठी हा एखाद्या राजमहालात वावरण्याचा अनुभव आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात १९८५ पासून कार्यरत असलेल्या वसंत मोहीतेंनी याबद्दल आपल्या भावना बोलून दाखवल्या. “माझ्यासाठी हा अनुभव एखाद्या स्वप्नासारखा आहे. पहिले मॅचच्या दिवशी तयारीसाठी आम्ही मैदानातच रहायचो. परंतू यंदा स्पर्धेला सुरुवात होण्याआधी मला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की यंदा तुमच्या राहण्याची सोय २ महिने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केलेली आहे.”
हे ऐकल्यानंतर सुरुवातीला मला आश्चर्याचा धक्काच बसला. आयपीएलमध्ये आमच्यासाठी कोणी अशा प्रकारची सोय करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. सामन्यादरम्यान Groundman चं काम रात्रीपर्यं चालतं. अनेकदा उशीर झाल्यामुळे या Groundman ना घरी जाता येत नव्हतं, अशावेळी ते मैदानात एखाद्या खोलीत रहायचे. परंतू यंदा आयपीएलने पडद्यामागच्या या हिरोंसाठी केलेली खास सोय पाहून ते देखील हरखून गेले आहेत.
ADVERTISEMENT