कॅप्टन्सी गेल्यानंतरही Virat ची आक्रमकता कायम, आफ्रिकन कॅप्टनशी घेतला पंगा; पाहा व्हिडीओ

मुंबई तक

• 07:36 AM • 20 Jan 2022

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ३१ धावांनी सामना जिंकत आफ्रिकेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकन कर्णधार टेंबा बावुमा आणि व्हॅन डर डसेन यांच्या शतकी खेळाच्या जोरावर आफ्रिकेने भारताला २९७ धावांचं आव्हान दिलं. ज्याचा पाठलाग करताना भारत २६५ धावांपर्यंत मजल मारु शकला. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा […]

Mumbaitak
follow google news

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ३१ धावांनी सामना जिंकत आफ्रिकेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकन कर्णधार टेंबा बावुमा आणि व्हॅन डर डसेन यांच्या शतकी खेळाच्या जोरावर आफ्रिकेने भारताला २९७ धावांचं आव्हान दिलं. ज्याचा पाठलाग करताना भारत २६५ धावांपर्यंत मजल मारु शकला.

हे वाचलं का?

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा हा पहिलाच वन-डे सामना होता. कर्णधारपद सोडलेलं असलं तरीही विराटचा मैदानातला आक्रमकपणा कमी झालेला दिसला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा फलंदाजी करत असताना विराट कोहली आणि त्याच्यात एक वाद रंगलेला पहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगदरम्यान ३६ व्या ओव्हरमध्ये चहलच्या बॉलिंगवर बावुमाने शॉर्ट कव्हरला एक फटका खेळला. या भागात क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने पटकन तो चेंडू पकडला आणि जोराने स्टंपच्या दिशेने थ्रो केला. यावेळी बावुमा स्ट्राईकवरच उभा होता. आपण धाव घेण्यासाठी पळालो नसतानाही विराटने एवढ्या जोराने चेंडू फेकल्याचे पाहून तो चिडला आणि विराटला रागाने काहीतरी म्हणू लागला.

हे पाहून विराटनेही बावुमाला आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. हा वाद काही काळाने शांत झाला असला तरीही या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

SA vs IND : कॅप्टन्सीची जबाबदारी गेली, पहिल्याच सामन्यात विराटने मोडला सचिनचा विक्रम

दरम्यान बावुमा आणि डसेन जोडीने द्विशतकी भागीदारी करत आफ्रिकेच्या संघाला संकटातून बाहेर काढलं. बावुमाने ११० तर डसेनने नाबाद १२९ धावांची खेळी केली.

SA vs IND : पहिल्याच वन-डे सामन्यात भारत पराभूत, मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून निराशा

    follow whatsapp