मोहाली कसोटीत दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताने आपलं वर्चस्व निर्माण केलं खरं…परंतू १७५ धावांवर फलंदाजी करत असणाऱ्या रविंद्र जाडेजाला द्विशतक करण्याची संधी न देता रोहित शर्माने भारताच्या पहिल्या डावाची घोषणा केली. रोहितच्या या कृतीमुळे चाहते नाराज झाले होते. परंतू दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस पत्रकारांशी बोलत असताना रविंद्र जाडेजाने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
आपणच टीम मॅनेजमेंटला चहापानाच्या सत्राआधी डाव घोषित करण्याचा सल्ला दिला होता असं जाडेजाने सांगितलं. “मोहालीच्या खेळपट्टीवर बाऊन्स असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. त्यातच श्रीलंकेचा संघ हा थकलेला दिसत होता, त्यामुळे आम्हाला त्यांना लवकर आऊट करण्याची संधी होती. त्यामुळे मी मॅनेजमेंटला सल्ला दिला की आपण डाव घोषित करुन त्यांना फलंदाजीला बोलवू शकतो. कारण श्रीलंकेच्या संघाने जवळपास पाच सेशन फिल्डींग केली होती, ज्यामुळे ते थकलेले दिसत होते.”
रोहितचा तो निर्णय, जड्डूची हुकलेली डबल सेंच्युरी; फॅन्स द्रविडवर नाराज…काय घडलं मोहालीत?
रविंद्र जाडेजा १७५ धावांवर खेळत असताना कर्णधार रोहित शर्मा कुलदीप यादवसोबत चर्चा करताना कॅमेरात पहायला मिळाला. त्यावेळी डाव घोषित करण्याबद्दल चर्चा सुरु असल्याचं बोललं जातंय. श्रीलंकेचे खेळाडू हे थकलेले होते, त्यामुळे अखेरच्या सेशनमध्ये मोठे फटके खेळणं सोपं नसतं. ते जास्त काळ तग धरु शकणार नव्हते याचा मला अंदाज होता. त्यामुळे डाव लवकर घोषित करुन त्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेण्याचं आम्ही ठरवलं असं स्पष्टीकरण जाडेजाने दिलं.
दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताने श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे. शतकी खेळी करणाऱ्या रविंद्र जाडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणरत्नेची महत्वाची विकेट घेतली.
Ind vs SL : मोहाली कसोटीवर भारताचं वर्चस्व कायम, श्रीलंका ४६६ धावांनी पिछाडीवर
ADVERTISEMENT