टीम इंडियातील ‘या’ क्रिकेटरची बहीण करणार सिनेसृष्टीत पदार्पण

मुंबई तक

• 03:55 PM • 02 Nov 2021

अतिशय सुंदर अशी अभिनेत्री मालती चाहर ही लवकर सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मालती ही टीम इंडियातील दीपक चाहर याची बहीण आहे. मागील काही दिवसांपासून ती खूपच चर्चेत आहे. मालती ही लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मालती ही आपल्या करिअरची सुरुवात बॉलिवूड नाही तर तामिळ सिनेमांमधून करणार आहे. मालती नवं प्रोडक्शन वेंचर Walking Talking Strawberry […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अतिशय सुंदर अशी अभिनेत्री मालती चाहर ही लवकर सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

मालती ही टीम इंडियातील दीपक चाहर याची बहीण आहे. मागील काही दिवसांपासून ती खूपच चर्चेत आहे.

मालती ही लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

मालती ही आपल्या करिअरची सुरुवात बॉलिवूड नाही तर तामिळ सिनेमांमधून करणार आहे.

मालती नवं प्रोडक्शन वेंचर Walking Talking Strawberry Ice Cream मध्ये काम करणार आहे.

ही बातमी स्वत: मालतीने आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.

मालतीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

मालती ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मालतीने याआधी letsmarry.com वेबसीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

मालती ही आपला भाऊ दीपक चाहरसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.

मालती ही मिस इंडिया अर्थ 2009, फेमिना मिस इंडिया 2014 ची सेकंड रनर अप होती.

मालती आणि दीपक यांचं खूपच चांगलं बाँडिंग आहे. ती दीपकच्या अनेक सामन्यातील व्हीडिओ आणि फोटो देखील आपल्या इंस्टावर शेअर करत असते.

मालती ही आपल्या सपोर्ट करण्यासाठी अनेकदा मैदानातही हजर असते.

याशिवाय मालती टीम इंडियाला आणि दीपक चाहरला सोशल मीडियावर अनेकदा चीयर करत असते.

मालती ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. तिचे इंस्टाग्रामव देखील बरेच फॉलोवर्स आहे.

मालती आता लवकरच सिनेसृष्टी पदार्पण करणार आहे. सध्या ती टॉलिवूडमधून आपलं नशीब आजमवणार असली तरीही बॉलिवूडमध्ये कधी एंट्री करते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

    follow whatsapp