ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यापूर्वी वाद चव्हाट्यावर आला आहे. 27 ऑक्टोबरला सिडनी येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सराव सत्रादरम्यान टीम इंडियाला थंड आणि न शिजवलेला नाश्ता देण्यात आला. त्यांना फक्त सँडविच देण्यात आले. संघाने आयसीसीला सांगितले की, सिडनीतील सराव सत्रानंतर दिलेले जेवण थंड होते.
ADVERTISEMENT
टीम इंडियाने सरावही केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण त्यांना सरावासाठी दिलेलं लोकेशन त्यांच्या हॉटेलपासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. वास्तविक, टीम इंडियाला ब्लॅकटाउन (सिडनीचे उपनगर) येथे सरावाची जागा देण्यात आली होती. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे, तिथून या ठिकाणाचं अंतर 42 किलोमीटर आहे.
हा वाद समोर आल्यानंतर आयसीसीचं म्हणणं समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने सांगितले की, ‘सर्व संघांसाठी जेवणाचा मेनू सारखाच ठेवण्यात आला आहे. खेळाडूंना दिलेल्या हँडबुकमध्येही याचा उल्लेख होता. जर त्यांना (टीम इंडिया) काही अडचण असेल तर त्यांनी आधी आक्षेप घ्यायला हवा होता. या खाद्यपदार्थाबाबत भारतीय कॅम्पकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. निवेदन आल्यास त्यानुसार प्रतिक्रिया दिली जाईल.
या T20 विश्वचषकात भारताचे पदार्पण दमदार झाले आहे. 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान संघाचा 4 गडी राखून पराभव केला होता.
भारताला उपांत्य फेरी गाठणे सोपे!
भारतीय संघ गटात नेदरलँड, बांगलादेश आणि झिम्बाब्वेसारखे संघ आहेत. नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेविरुद्ध भारताला विजय मिळवण्यात जास्त अडचण येणार नाही. बांगलादेशविरुद्ध विजय मिळविण्यासाठी भारताला संघर्ष करावा लागू शकतो.
५ पैकी ४ सामने जिंकावे लागतील
यावेळी उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला पाचपैकी चार सामने जिंकावे लागतील. तसे, तीन सामने जिंकूनही भारत उपांत्य फेरीचे तिकीट कापू शकतो, पण त्यासाठी त्याला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. गेल्या विश्वचषकातही भारताने तीन सामने जिंकले होते मात्र उपांत्य फेरीत त्यांना स्थान मिळवता आले नव्हते.
ADVERTISEMENT