इंग्लंड दौऱ्यासाठी महिला संघाची घोषणा, १ टेस्ट, ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांचा दौरा

मुंबई तक

• 05:19 PM • 14 May 2021

नवीन वर्षात भारतीय महिला संघाच्या पहिल्या परदेश दौऱ्याची बीसीसीआयने घोषणा केली आहे. मिताली राज आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडमध्ये १ टेस्ट, ३ वन-डे आणि टी-२० मॅच खेळणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी रात्री संघाची घोषणा केली. मराठमोळा रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अपेक्षेप्रमाणे टेस्ट आणि वन-डे संघाचं नेतृत्व मिताली […]

Mumbaitak
follow google news

नवीन वर्षात भारतीय महिला संघाच्या पहिल्या परदेश दौऱ्याची बीसीसीआयने घोषणा केली आहे. मिताली राज आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडमध्ये १ टेस्ट, ३ वन-डे आणि टी-२० मॅच खेळणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी रात्री संघाची घोषणा केली.

हे वाचलं का?

मराठमोळा रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

अपेक्षेप्रमाणे टेस्ट आणि वन-डे संघाचं नेतृत्व मिताली राजकडे तर टी-२० संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आलं आहे.

असा असेल टीम इंडियाचा इंग्लंड दौरा –

  • एकमेव टेस्ट मॅच – १६ ते १९ जून

  • पहिली वन-डे : २७ जून

  • दुसरी वन-डे : ३० जून

  • तिसरी वन-डे : ३ जुलै

  • पहिली टी-२० : ९ जुलै

  • दुसरी टी-२० : ११ जुलै

  • तिसरी टी-२० : १५ जुलै

रमेश पोवार आणि मिताली राज यांनी आपापसातले मतभेद दूर करणं गरजेचं – दीप दासगुप्ता

    follow whatsapp