आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दोन नवीन संघ असलेल्या गुजरात आणि लखनऊमध्ये आज पहिला सामना खेळवण्यात आला. पंजाबची साथ सोडून लखनऊच्या नेतृत्वाची कमान हाती सांभाळणाऱ्या लोकेश राहुलची यंदाच्या हंगामातली सुरुवात मात्र चांगली झाली नाही. मोहम्मद शमीने सामन्यातल्या पहिल्याच बॉलवर लोकेश राहुलला शून्यावर आऊट केलं.
ADVERTISEMENT
यानिमीत्ताने लोकेश राहुलच्या सोबत एक अनोखा योगायोग जुळून आला. २०१६ साली लोकेश गुजरात लायन्स संघाविरुद्ध खेळताना शून्यावर आऊट झाला होता. यानंतर तब्बल पाच वर्षांनी लोकेश राहुल गुजरातच्या संघाविरुद्ध खेळताना शून्यावर माघारी परतला.
मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर लोकेश राहुल आऊट असल्याचं अपील अंपायरने फेटाळून लावलं होतं. परंतू DRS मध्ये लोकेश राहुल आऊट असल्याचं कळताच गुजरातच्या खेळाडूंनी जल्लोष केला. यानिमीत्ताने लोकेश राहुलची आयपीएलमधली आणखी एक परंपरा खंडीत झाली. २०१८ पासून आयपीएलमध्ये धावांचा रतीब घालणारा लोकेश राहुल एकदाही शून्यावर आऊट झाला नव्हता. परंतू यंदाच्या हंगामात त्याच्यावर पहिल्याच सामन्यात ही वेळ ओढावली.
मोहम्मद शमीने गुजरात संघाकडून पहिला सामना खेळताना लोकेश राहुल, क्विंटन डी-कॉक आणि मनिष पांडेला पहिल्या पॉवरप्लेमध्ये आऊट करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
ADVERTISEMENT