IPL 2022 : आज भिडणार गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंटस्; ‘या’ खेळाडूंवर असेल नजर

मुंबई तक

• 08:45 AM • 28 Mar 2022

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेत आज नव्यानेच दाखल झालेले दोन संघ भिडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. गुजरातकडून शुभमन गिल आणि रहमानुल्लाह गुरबाज सलामीला असणार आहे. सध्या दोघेही लयीत असल्याने त्यांना रोखण्याचं आव्हान लखनौसमोर असणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये रात्री ७.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार […]

Mumbaitak
follow google news

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेत आज नव्यानेच दाखल झालेले दोन संघ भिडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. गुजरातकडून शुभमन गिल आणि रहमानुल्लाह गुरबाज सलामीला असणार आहे. सध्या दोघेही लयीत असल्याने त्यांना रोखण्याचं आव्हान लखनौसमोर असणार आहे.

हे वाचलं का?

वानखेडे स्टेडियममध्ये रात्री ७.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. गुजरातकडून हार्दिक पंड्याच्या कामगिरी जास्त लक्ष असणार आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव हार्दिक पंड्याच्या पाठिशी आहे.

IPL 2022 : RCB चे प्रयत्न व्यर्थ, द्विशतकी लक्ष्याचा पाठलाग करत पंजाबचा धडाकेबाज विजय

षटकार खेचण्यात माहिर असलेला हार्दिक पंड्या आज कोणत्या क्रमांकावर खेळण्यास येतो, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्याचबरोबर राहुल तेवतियाकडेही नजरा असतील. तेवतियाने आधी आपले इरादे स्पष्ट केले असून, फलंदाज म्हणून आपण अधिक जबाबदारीने खेळू असं त्याने म्हटलेलं आहे.

कर्नाटकचा अभिनव मनोहर आणि डेव्हिड मिलर मधल्या फळीत असतील. दुसरीकडे गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमीकडे असेल. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्व चषक स्पर्धेच्या संघात निवड होण्याच्या दृष्टीने खेळ करण्यावर शमीचा भर असेल. गुजरातकडून खेळत असलेल्या विजय शंकर गोलंदाजीतून काय कमाल करतो, हेही महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाज राशिद खानमुळे गुजरातची गोलंदाजी अधिक भक्कम असेल.

परंपरा कायम, मुंबईची पहिली मॅच देवाला ! हातात आलेला सामना गमावल्याबद्दल रोहित म्हणतो…

आयपीएलमध्ये नवीन संघ असलेल्या लखनौचं नेतृत्व केएल राहुल करत आहे. राहुल दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकसोबत सलामीला येईल. लखनौकडे दीपक हुड्डा, कृणाल पंड्या आणि वेस्ट इंडिजचा जैसन होल्डर यासारखे फटकेबाजी करणारे करणार फलंदाज आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत मनीष पांडेही असेल. लखनौच्या गोलंदाजीची धुरा आवेश खानकडे असेल. त्याचबरोबर फिरकी गोलंदाज रवि बिश्नोई असणार आहे.

हार्दिक पंड्या करणार षटकारांचं शतक

लखनौ विरुद्धच्या सामन्यातून पुन्हा मैदानावर वापसी करत असलेला हार्दिक पंड्या आज षटकारांचा विक्रम करू शकतो. हार्दिक पंड्याच्या नावे आयपीएलमध्ये ९२ सामन्यात ९८ षटकार आणि ९७ चौकार आहे. लखनौविरुद्ध दोन षटकार खेचताच हार्दिकच्या नावे षटकारांचं शतक नोंदवलं जाईल. त्याबरोबर चौकारांच्या ३ पावलंच दूर आहे.

असे आहेत दोन्ही संघ

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गरकीरत सिंह, साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानुल्लाह गुरबाज, रिधीमान साहा, अलझारी जोसेफ, दर्शन नळकांडे, डोमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, राशिद खान, रवि श्रीनिवास साई, वरुण अरोन, यश दयाल.

लखनौ सुपर जायंटस् : केएल राहुल (कर्णधार), मनन व्होरा, एविन लुई, मनीष पांडे, क्विंटन डिकॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चामीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, आवेश खान, एंड्र्यू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मायर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, जैसन होल्डर.

    follow whatsapp