आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचा लिलाव नुकताच बंगळुरुत पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावामध्ये संघमालकांनी भारतीय खेळाडूंसाठी भरपूर पैसे खर्च केले. अनेक नवोदीत आणि युवा खेळाडूंनाही यंदा बोली लागली. परंतू चाहत्यांकडून मिस्टर आयपीएलचा किताब मिळवणाऱ्या सुरेश रैनाची पाटी यंदा मात्र कोरीच राहिली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज सोडा एकाही संघाने रैनाला विकत घेण्यात रस दाखवला नाही.दोन दिवस चाललेल्या लिलावात २०० पेक्षा जास्त खेळाडूंवर बोली लागल्या, ज्यासाठी संघमालकांनी ५५१.७० कोटी रुपये खर्च केले. परंतू यामध्ये सुरेश रैना, स्टिव्ह स्मिथ, इशांत शर्मा यासारख्या दिग्गजांची वर्णी लागलेली नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी रैनाचं नाव पुन्हा यादीत आलं नाही त्यावेळी चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. अनेक चाहत्यांनी या निर्णयावरुन सोशल मीडियावर आपली नाराजीही व्यक्त केली.
ADVERTISEMENT
दोन दिवस चाललेल्या लिलावात २०० पेक्षा जास्त खेळाडूंवर बोली लागल्या, ज्यासाठी संघमालकांनी ५५१.७० कोटी रुपये खर्च केले. परंतू यामध्ये सुरेश रैना, स्टिव्ह स्मिथ, इशांत शर्मा यासारख्या दिग्गजांची वर्णी लागलेली नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी रैनाचं नाव पुन्हा यादीत आलं नाही त्यावेळी चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. अनेक चाहत्यांनी या निर्णयावरुन सोशल मीडियावर आपली नाराजीही व्यक्त केली.
चेन्नई आणि गुजरातचं प्रतिनिधीत्व केलेला सुरेश रैना हा आयपीएलमधला अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो. २०४ सामन्यांमध्ये रैनाच्या नावावर ५५२८ धावा जमा आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रैना हा चौथ्या क्रमांकावर आहे. २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर रैना २०२१ च्या आयपीएलमध्ये अखेरचा खेळला. त्या हंगामात रैनाला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे यंदा त्याच्यावर बोली लावण्यात आलेली नसल्याचं समजतंय. सुरेश रैनाची यंदाच्या हंगामात २ कोटींची बोली लावण्यात आली होती.
IPL 2022 Mega Auction: इशान किशन सर्वात महागडा खेळाडू, सुरेश रैनासाठी कोणाचीच बोली नाही
ADVERTISEMENT