आयपीएलचं सलग पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इडियन्ससाठी १५व्या हंगामाची सुरूवात, मात्र निराशाजनक राहिली आहे. मुंबई इडियन्सला सलग चार पत्करावे लागले आहेत. सध्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना चक्क नीता अंबानी यांनीच फोन केला. खेळाडूंशी संवाद करतानाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिली मॅच गमावल्यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर झालेल्या तीनही सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही खंत व्यक्त केली होती.
या पराभवानंतर मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या नीता अंबानी खेळाडूंशी संवाद करताना पाहायला मिळत आहे. नीता अंबानी या फोनवरून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा आत्मविश्वार वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
नीता अंबानींनी खेळाडूंना काय दिला संदेश?
नीता अंबानी खेळाडूंना म्हणाल्या, “मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपण पुन्हा आघाडी घेऊन याबद्दल विश्वास आहे. आता आपण केवळ पुढे आणि वरच्या दिशेनंच जाणार आहोत. आपण जिंकणार आहोत, असा विश्वास आपल्या स्वतः वर करण्याची गरज आहे,” असं नीता अंबानी म्हणताना दिसत आहेत.
“आपण यापूर्वीही अनेकदा अशा परिस्थितीतून गेलेलो आहोत. नंतर पुढे गेलो आणि स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेलं आहे. त्यामुळेच मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही एकमेकांना साथ द्याल. जर तुम्ही एकमेकांसोबत असाल, तर आपण विजय मिळवूच. तोपर्यंत जी काही तुमची इच्छा आहे, त्याला माझं पूर्णपणे पाठिंबा आहे. कृपया स्वतःवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. मुंबई इंडियन्स नेहमीच तुमच्या पाठिशी आहे,” असं नीता अंबानी खेळाडूंना म्हणाल्या.
आयपीएल स्पर्धेची सुरूवात पराभवाने होण्याची ही मुंबई इंडियन्सची पहिली वेळ नाही. २०१४ मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभूत झाली होती. त्यानंतर पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबईने पहिला विजय मिळवला होता. त्या हंगामात मुंबई अंतिम चार संघाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती.
पुढचा सामना पंजाब किंग्जसोबत
२०१५ मध्येही मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे चार सामने गमावले होते. पहिल्या चार पराभवानंतरही मुंबईने अंतिम फेरीत धडक मारत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पुढील सामना पंजाब किंग्ज सोबत होणार आहे. बुधवारी (१३ एप्रिल) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.
ADVERTISEMENT