IPL मध्ये कोरोनाने एंट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पूर्ण टीमला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ESPN क्रिक इन्फोने दिलेल्या रिपोर्टच्या माहितीच्या आधारे टीममध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह केसेस आल्या आहेत. त्यापैकी एक रूग्ण हा टीमच्या स्टाफशी संबंधित आहे तर दुसरा रूग्ण हा एक विदेशी खेळाडू आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच पॅट्रीक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दिल्ली कॅपिटल्सची पुढची मॅच २० एप्रिलला पंजाब किंग्जसोबत होणार आहे. त्यामुळे ऋषभ पंत कप्तानी करत असलेल्या या टीमला १८ एप्रिला पुण्यात पोहचायचं आहे. ही मॅच पुण्यातली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र आता या खेळाडूंना मुंबईच्या हॉटेलमध्येच रोखण्यात आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व खेळाडूंची पुढचे दोन दिवस कोरोना चाचणी केली जाणार आहे त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल.
TATA IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी पाहिली तर आत्तापर्यंत चार गुणांची कमाई करत हा संघ आठव्या स्थानी आहे. टीमने आत्तापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल आणि आरसीबी यांच्यात १६ एप्रिलला सामना झाला होता. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स १६ धावांनी पराभूत झाला होता.
IPL च्या मागच्या दोन सिझनमध्येही कोरोनाने शिरकाव केला होता. २०२० मध्ये आयपीएल उशिरा सुरू झालं होतं त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन UAE मध्ये करण्यात आलं होतं. तर २०२१ चा सिझन मध्येच स्थगित करण्यात आला होता. जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा फक्त २९ सामने खेळवले गेले होते.
ADVERTISEMENT