नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीअमवर मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात मुंबईने पहिल्यांदा बॅटींग करताना १५५ धावांचा टप्पा गाठला. युवा खेळाडू तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ही आव्हातान्मक धावसंख्या गाठली. परंतू या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
रोहित शर्मा आणि इशान किशन या मुंबईच्या सलामीच्या जोडीला चेन्नईच्या मुकेश चौधरीने स्वस्तात माघारी धाडलं. रोहित आणि इशान एकही धाव न काढता माघारी परतले. याचसोबत रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर आऊट होणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. रोहितची शून्यावर आऊट होण्याची ही चौदावी वेळ ठरली आहे.
रोहितचा अपवाद वगळता अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल, अंबाती रायुडू, मनदीप सिंग, हरभजन सिंग, पियुष चावला हे खेळाडू आयपीएलमध्ये १३ वेळा शून्यावर आऊट झाले आहेत.
चेन्नईकडून मुकेश चौधरीने ३ विकेट घेत चांगली कामगिरी केली. खराब सुरुवात झाल्यानंतर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि हृतिक शोकेन यांच्या फटकेबाजीमुळे मुंबईने सामन्यात आव्हानात्मक धावसंख्येचा टप्पा गाठला. परंतू रोहीत शर्माची निराशाजनक कामगिरी मात्र मुंबईच्या संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
ADVERTISEMENT