सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण पाठोपाठ ‘या’ भारतीय क्रिकेटरलाही कोरोनाची लागण

मुंबई तक

• 03:03 AM • 30 Mar 2021

बडोदा: भारतात आता कोरोना व्हायरसची दुसरी लाट पाहायला मिळते आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत बरीच वाढ होत आहे. यावेळी सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी कोरोनाच्या प्रकोपापासून कुणाही वाचू शकलेलं नाहीत. अनेक खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचं दिसतं आहे. युसूफ पठाणनंतर आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इरफान पठाण हा देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. इरफान पठाण […]

Mumbaitak
follow google news

बडोदा: भारतात आता कोरोना व्हायरसची दुसरी लाट पाहायला मिळते आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत बरीच वाढ होत आहे. यावेळी सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी कोरोनाच्या प्रकोपापासून कुणाही वाचू शकलेलं नाहीत. अनेक खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचं दिसतं आहे. युसूफ पठाणनंतर आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इरफान पठाण हा देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

हे वाचलं का?

इरफान पठाण सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. त्यामुळे त्याने आपण पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इरफान चौथा भारतीय क्रिकेटर आहे ज्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरही कोरोनाच्या विळख्यात, Twitter वरुन दिली माहिती

इरफान पठाणने आपल्या ट्विटरवर याबाबत माहिती देताना असं म्हटलं आहे की, कोणत्याही लक्षणाशिवाय माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं असून घरातच क्वॉरंटाईन आहे. मागील काही दिवसात जे लोकं माझ्या संपर्कात आले आहेत त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. सर्वांच्या चांगल्या आरोग्य लाभो ही कामना करतो.

सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण आणि एस बद्रीनाथ यांनाही कोरोनाची लागण

याआधी भारतीय बॅट्समन एस बद्रीनाथने रविवार म्हटलं होतं की, त्याला कोरोनाची लागण झाली आहे आणि तो सध्या होम क्वॉरंटाइन आहे. ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टूर्नामेंट’मधील तो भारताचा तिसरा माजी क्रिकेटर आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी भारतीय ऑल राऊंडर युसूफ पठाण हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये ‘नो एंट्री’, कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक

अनेक खेळाडूंनी शेअर केलं होतं ड्रेसिंग रुम

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये खेळविण्यात आली होती. यावेळी 16 मार्चला ड्रेसिंग रुममध्ये इंडिया लीजेंड्सच्या खेळाडूंसह कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी केक पाहिला आहे. सचिनने याच दिवशी आपल्या क्रिकेट करिअरमध्ये 100 शतकं पूर्ण केली होती. यावेळी इरफान पठाण, युवराज, मोहम्मद कैफ, युसूफ आणि प्रग्यान ओझायांच्या अनेक खेळाडू तिथे उपस्थित होते.

कोरोनाची रुग्णसंख्या पाहून BMC ने कसली कंबर, सर्व हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश

दुसरीकडे मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबई महापालिकेने एक विशेष पत्रक काढत शहरातील सर्व हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश देत एक नियमावली जाहीर केली आहे. ज्यात आपल्या हॉस्पिटल्समधील बेड्सची संख्या वाढवण्यापासून ते औषधांचा साठा पुरेसा आहे की नाही हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    follow whatsapp