ADVERTISEMENT
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अजूनही चर्चेत असतो.
इरफान पठाण सध्या कॉमेंट्रीमध्ये जलवा दाखवत आहे. नुकताच तो सानिया मिर्झाच्या एका कार्यक्रमात दिसला.
यावेळी इरफान पत्नी सफा बेग आणि त्यांच्या दोन मुलांसह दिसला. त्यांचं लग्न 2016 मध्ये झालं आहे.
सफा बेग डोक्यावर स्कार्फ आणि चेहऱ्यावर मास्क परिधान करून होती. तिच्यासोबत मुलगा इम्रानही होता.
इरफान पठाण अनेकदा पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो, मात्र प्रत्येक वेळी त्यात पत्नीचा चेहरा झाकलेला असतो.
अनेकवेळा चाहत्यांनी इरफान पठाणला या मुद्द्यावरून ट्रोल केलं आहे, मात्र प्रत्येक वेळी त्याने याला प्रायव्हसी म्हटलं आहे.
पण यावेळी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यात सफा बेगचा चेहरा दिसला आहे.
एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असं सफा बेगचं सौंदर्य आहे.
ADVERTISEMENT