Anaya Bangar Interview: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कोच संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला. अनाया बांगर अशी तिची नवी ओळख आहे. अनाया ही तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या जीवनातील धक्कादायक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. अनाया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीत तिने बऱ्याच क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप लावले आहेत.
ADVERTISEMENT
'बैठकी' या लल्लनटॉपच्या एका विशेष कार्यक्रमात मीडिया इन्फ्लुएन्सर अनाया बांगर हिने उपस्थिती लावली होती. अनाया तिच्या लिंगबदलापूर्वी आर्यन बांगर या नावाने ओळखला जात होता. या मुलाखतीत अनायाने ट्रान्सजेंडर महिलेच्या रूपातील तिचे अनुभव शेअर केले आहेत. या मुलाखतीतील चर्चेदरम्यान तिने सांगितले की, काही क्रिकेटपटूंनी त्यांचे न्यूड फोटोज पाठवले होते आणि शिव्यासुद्धा दिल्या होत्या, असे ती म्हणाली.
अनायाने या मुलाखतीत तिच्या जेंडर चेंज शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं. तिच्या जीवनातील या मोठ्या बदलामुळे तिच्या क्रिकेट करिअरसह बऱ्याच गोष्टींना वेगळेच वळण मिळाले.
हे ही वाचा: 'अनैतिक संबंध ठेवतो काय...', 6 जणांनी मिळून तलवारीने कापलं तरुणाचं गुप्तांग
क्रिकेटपटूंचा अनाया बांगरला पाठिंबा
लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटपटूंकडून किती पाठिंबा मिळाला? यावर आपलं मत व्यक्त करताना ती म्हणाली, "मला इतर क्रिकेटपटूंकडून पाठिंबा तर मिळाला, परंतु काही लोकांनी मला त्रासही दिला आहे. काही क्रिकेटपटूंनी तर मला त्यांचे नग्न फोटोही पाठवले." मुलाखतीदरम्यान तिने अशा व्यक्तीबद्दल सर्वांना सांगितले जी सर्वांसमोर तिला शिवीगाळ करायची. तोच माणूस तिच्या जवळ जाऊन बसायचा आणि तिचे फोटोज मागायचा, असे तिने सांगितले.
दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला- "माझ्याशी संबंध बनव"
अनायाने या मुलाखतीत एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला. एका दिग्गज क्रिकेटपटूने अनायासोबत संबंध बनवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं तिने सांगितलं. मुलाखतीदरम्यान अनाया म्हणाली, "मी जेव्हा भारतात होते, तेव्हा मी माझ्या सहकारी क्रिकेटपटूला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले. त्यावेळी तो म्हणाला, 'चल कारमध्ये, मला तुझ्यासोबत झोपायचं आहे.' काही लोकांच्या अशा वागण्याचा मला खूप त्रास झाला."
अनाया बांगरचं क्रिकेट करिअर
आर्यन उर्फ अनायाने 18 व्या वर्षी लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले. यापूर्वी तो मुंबईतील स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये इस्लाम जिमखान्याकडून खेळला होता. आर्यनने 2019 मध्ये राष्ट्रीय अंडर-19 (कूच बिहार ट्रॉफी) मध्ये पुडुचेरीचे प्रतिनिधित्व केले आणि त्यावेळी त्याने पाच सामन्यांमध्ये 150 आणि दोन अर्धशतकांसह 300 धावा केल्या. यादरम्यान, त्याने 20 विकेट्सही घेतल्या.
हे ही वाचा: Solapur: हजारो मेंदूचे ऑपरेशन करणाऱ्या सुप्रसिद्ध डॉक्टरने घेतली डोक्यात गोळी झाडून, कोण होते Shirish Valsangkar?
आर्यन बांगर (अनाया बांगर) चे वडील संजय बांगर हे सध्याच्या काळातील एक उत्तम क्रिकेट प्रशिक्षक मानले जातात. बांगर यांनी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चे प्रशिक्षकपद भूषवले आहे. बांगर हे टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षकही राहिले आहेत. 52 वर्षीय बांगर यांनी भारतासाठी 12 टेस्ट आणि 15 (वनडे) एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान, त्यांनी 650 धावा आणि 14 विकेट घेतल्या आहेत.
पाहा संपूर्ण व्हिडिओ
ADVERTISEMENT
