Virat kohli निवृत्त होतोय का?, ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 31 Mar 2023, 08:41 AM)

माजी कर्णधार विराट कोहलीने शनिवारी (26 नोव्हेंबर) एक पोस्ट शेअर करून सर्वांना बुचकळ्यात टाकलं आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या इनिंगची आठवण करून देत त्याने एक फोटोही शेअर केला आहे.

is virat kohli retiring?

is virat kohli retiring?

follow google news

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक 2022 मध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही. उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत होऊन भारतीय संघ बाहेर पडला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक मानला जात आहे. (Is Virat Kohli retiring?, Fans are excited because of ‘that’ post)

हे वाचलं का?

Virat Kohli ची पत्नी अनुष्का शर्माला हायकोर्टाकडून मोठा झटका, प्रकरण काय?

आता हे सर्व दोन वर्षांनी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळणार का? असा सवाल नेहमी उपस्थित केला जातो. दरम्यान, माजी कर्णधार कोहलीने शनिवारी (26 नोव्हेंबर) एक पोस्ट शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या इनिंगची आठवण करून देत त्याने एक फोटोही शेअर केला.

कोहलीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला

ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याचे चाहते चांगलेच घाबरले. त्यांना वाटले की कोहलीने निवृत्ती जाहीर केली आहे. कोहलीने ही पोस्ट इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केली आहे. यावर कमेंट करताना चाहत्यांनी लिहिले की, ‘अशी पोस्ट शेअर करू नको. हृदयविकाराचा झटका येतायेता राहिला. एकदा असे वाटले की तू निवृत्ती घेतली आहे.

मुंबईच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याशी जोडले

याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, ‘अशी पोस्ट टाकून तू मला 10 सेकंद घाबरवले. निवृत्तीची पोस्ट आहे असे वाटले. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हॅपी रिटायरमेंट किंग.’ तसेच, आणखी एका युजरने ही पोस्ट मुंबईतील 26/11 या दहशतवादी हल्ल्याशी जोडली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “विराट कोहली सरांनी आज पोस्ट का केली, तुमचा संबंध समजत आहे का?”

विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला पूजणं बंद करा, गौतम गंभीर असं का म्हणाला?

धोनीने अशाच पद्धतीने निवृत्ती घेतली होती

वास्तविक, कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बॅटसह पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसत आहे. यासोबत कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ’23 ऑक्टोबर 2022 माझ्या हृदयात नेहमीच खास असेल. क्रिकेटच्या खेळात मला याआधी कधीच इतकी ऊर्जा जाणवली नव्हती. किती छान संध्याकाळ होती ती.

अशाच पद्धतीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही दोन वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ‘तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. मला 7.29 पासून निवृत्त समजा.

विराट कोहली झाला ट्रोल; भौंक_मत_कोहली का होतंय ट्रेंड?

 

    follow whatsapp