आगामी काळात भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. येत्या सोमवारी पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा हंगामी कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी संघाची कमान ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कर्णधार केएल राहुलशिवाय फिरकीपटू कुलदीप यादवही दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बुधवारी सरावादरम्यान केएल राहुलला दुखापत झाली आणि इंग्लंड दौऱ्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा असणार आहे.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल कंबरेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर पडला आहे, तर कुलदीप यादव काल संध्याकाळी नेटमध्ये फलंदाजी करत असताना त्याला दुखापत झाली आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय केएल राहुलच्या रुपात भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. केएल राहुलला संघातून बाहेर पडल्यानंतर आता रुतुराज गायकवाड आणि इशान किशन डावाजी सुरुवात करण्याची शक्यता आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप राहुलच्या बदलीचा निर्णय घेतला नाही.
भारताचा संघ
रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/ विकेटकिपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुमार भुवन, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
ADVERTISEMENT