Ind vs NZ Test : न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारताला झुंजवलं, भारतीय गोलंदाज अपयशी

मुंबई तक

• 12:05 PM • 26 Nov 2021

भारताच्या ३४५ धावांना उत्तर देताना न्यूझीलंडनेही पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दुसऱ्या दिवसाअखेरीस नाबाद अर्धशतकी खेळी करुन संघाची बाजू मजबुत केली आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता १२९ धावांपर्यंत मजल मारली आहे. लॅथम आणि यंग या दोन्ही सलामीवीरांनी सावध सुरुवात करुन दुसरं सत्र खेळून […]

Mumbaitak
follow google news

भारताच्या ३४५ धावांना उत्तर देताना न्यूझीलंडनेही पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दुसऱ्या दिवसाअखेरीस नाबाद अर्धशतकी खेळी करुन संघाची बाजू मजबुत केली आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता १२९ धावांपर्यंत मजल मारली आहे.

हे वाचलं का?

लॅथम आणि यंग या दोन्ही सलामीवीरांनी सावध सुरुवात करुन दुसरं सत्र खेळून काढलं. विकेट पडणार नाही. इशांत शर्मा आणि उमेश यादव या जोडीला दोन्ही फलंदाजांनी दाद दिली नाही हे पाहून कर्णधार अजिंक्य रहाणेने लवकरच स्पिनर्स बॉलर्सना संधी दिली. परंतू या दोन्ही फलंदाजांनी आश्विन, जाडेजा आणि पटेल या तिन्ही फिरकीपटूंना सावधतेने खेळून काढलं. विशेषकरुन विल यंगने काही सुरेख फटके खेळून आपलं अर्धशतक साजरं केलं.

विल यंग आक्रमक क्रिकेट खेळत असताना टॉम लॅथमने एक बाजू लावून धरली होती. मैदानावर स्थिरावल्यानंतर त्यानेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

Ind vs NZ : कानपूर मे आपका स्वागत है…गुटखा खाऊन मॅच पाहणारा चाहता सोशल मीडियावर व्हायरल

त्याआधी, न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३४५ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकर श्रेयस अय्यरचं शतक आणि त्याला शुबमन गिल, रविंद्र जाडेजाने दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयसने या सामन्यात १०५ धावांची खेळी केली.

पहिल्या दिवसाअखेरीस श्रेयस अय्यर ७५ तर रविंद्र जाडेजा ५० धावांवर नाबाद होता. परंतू दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम साऊदीने भारताला एका मागोमाग एक धक्के देण्यास सुरुवात केली.

Ind vs NZ Test : …आणि श्रेयसने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, पदार्पणाच्या कसोटीत खडूस शतकी खेळी

अर्धशतक झळकावलेल्या रविंद्र जाडेजाला क्लिन बोल्ड करत साऊदीने भारताला दुसऱ्या दिवसात पहिला धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यरने वृद्धीमान साहाच्या साथीने काही सुरेख फटके खेळत आपलं पहिलं-वहिलं शतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा बहुमान यावेळी श्रेयस अय्यरने पटकावला. परंतू दुसऱ्या बाजूने साऊदीने टीम इंडियाला डावाला खिंडार पाडलं.

Shreyas Iyer: जे सचिनलाही जमलं नाही ते श्रेयसने करुन दाखवलं, पदार्पणातच ‘यांनी’ झळकावलंय कसोटी शतक!

वृद्धीमान साहा, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर यांना ठराविक अंतराने आपल्या जाळ्यात अडकवत साऊदीने टीम इंडीया मोठी धावसंख्या उभारणार नाही याची काळजी घेतली. लंच सेशनपर्यंत भारताने ८ विकेट गमावल्या होत्या. रविचंद्रन आश्विनने तोपर्यंत संघाचा किल्ला चांगला लढवला. दुसऱ्या सेशनमध्ये आश्विन आणि इशांत शर्माला आऊट करत टीम इंडियाचा डाव संपवला. न्यूझीलंडकडून साऊदीने ५, जेमिन्सनने ३ तर पटेलने २ विकेट घेतल्या.

    follow whatsapp