खाया पिया कुछ नही…न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेसाठी तैनात पाकिस्तान पोलिसांनी फस्त केली २७ लाखांची बिर्याणी

मुंबई तक

• 12:52 PM • 23 Sep 2021

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्की सहन करावी लागली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातली मालिका सामन्याला सुरुवात होण्याआधी अर्धा तास रद्द करण्यात आली. सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तानात मालिका खेळण्यास नकार दिला. यापाठोपाठ इंग्लंडनेही आपला प्रस्तावित पाकिस्तान दौरा रद्द केला. या घडामोडींमुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठं नुकसान झालेलं असतानाच आणखी […]

Mumbaitak
follow google news

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्की सहन करावी लागली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातली मालिका सामन्याला सुरुवात होण्याआधी अर्धा तास रद्द करण्यात आली. सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तानात मालिका खेळण्यास नकार दिला. यापाठोपाठ इंग्लंडनेही आपला प्रस्तावित पाकिस्तान दौरा रद्द केला.

हे वाचलं का?

या घडामोडींमुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठं नुकसान झालेलं असतानाच आणखी एका प्रसंगामुळे PCB चं हसं होताना दिसत आहे.

न्यूझीलंड दौरा रद्द झाला असला तरी या दौऱ्यासाठी 27 लाख रुपयांचं बिर्याणीचं बिल आलं आहे. न्यूझीलंडच्या टीमला सुरक्षा देणाऱ्या पाकिस्तानी पोलिसांनी ही बिर्याणी खाल्ल्याचं वृत्त स्थानिक पाकिस्तानी वेबसाईटने दिलं आहे. न्यूझीलंड टीमला 8 दिवस सुरक्षा देण्यासाठी पोलिसांची संपूर्ण टीम तैनात करण्यात आली होती. न्यूझीलंडची टीम इस्लामाबादच्या सेरेना हॉटेलमध्ये थांबली होती, यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या इस्लामाबाद पोलिसांनी 27 लाख रुपयांच्या बिर्याणीवर ताव मारला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी 5 एसपी आणि अनेक एसएसपी अधिकारी यावेळी तैनात करण्यात होते. या सगळ्यांनी मिळून 8 दिवस बिर्याणीची पार्टी केल्यामुळे 27 लाखांचं बील झाल्याचं बोललं जातंय.

PCB ला आणखी एक धक्का, न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या संघाचाही पाकिस्तानात येण्यास नकार

याआधी पाकिस्तानात श्रीलंकेच्या संघावर झालेला अतिरेकी हल्ला लक्षात घेता पाक क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडच्या संघासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. इस्लामाबाद कॅपिटल टेरेटरी पोलिसांचे 500 अधिकारी यावेळी हॉटेल परिसरात तैनात होते. या अधिकाऱ्यांच्या दोनवेळचा जेवणाचा खर्च जोरदार झाला असून बहुतांश अधिकाऱ्यांनी दोन्ही वेळच्या जेवणांत बिर्याणीवर ताव मारल्यामुळे मोठं बिल तयार झालं. पाक क्रिकेट बोर्डाच्या अकाऊंट्स डिपार्टमेंटकडे जेव्हा ही बिलाची रक्कम मंजुरीसाठी आली त्यावेळी याचा खुलासा झाला.

    follow whatsapp