पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’ मध्ये टीम इंडियाचं कौतुक

मुंबई तक

• 10:03 AM • 31 Jan 2021

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीवर पराभवाचं पाणी पाजत विजयी पताका लावली. २-१ च्या फरकाने बॉर्डर – गावसकर ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चारही बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातूनही टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे. “या महिन्यात आपल्याला क्रिकेटच्या मैदानातून एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. […]

Mumbaitak
follow google news

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीवर पराभवाचं पाणी पाजत विजयी पताका लावली. २-१ च्या फरकाने बॉर्डर – गावसकर ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चारही बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातूनही टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे.

हे वाचलं का?

“या महिन्यात आपल्याला क्रिकेटच्या मैदानातून एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. सुरुवातीला काही अडथळे आल्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. भारतीय संघाने केलेली मेहनत आणि परिश्रम नक्कीच वाखणण्याजोगं आहे”, अशा शब्दांत मोदी यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं.

नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला क्रिकेटपटूंनीही प्रतिसाद देत त्यांचे आभार मानले आहेत.

ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींनीही टीम इंडियाला चांगलंच सतावलं. अशा खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणेने नवख्या खेळाडूंना सोबत घेऊन ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला.

    follow whatsapp