ADVERTISEMENT
पाकिस्तान सुपर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात पेशावर झाल्मीने 12 धावांनी विजय मिळवला.
इस्लामाबाद युनायटेडविरुद्धच्या या विजयाचा हिरो ठरला बाबर आझम.
कर्णधार बाबर आझमने 39 चेंडूंत 10 चौकारांसह 64 धावांची खेळी केली.
या शानदार खेळीदरम्यान बाबर आझमने एक मोठा विक्रम रचला आहे.
बाबर आता T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बाबरने 225 डावात नऊ हजार धावा केल्या.
बाबरने ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकलं आहे, ज्याने 249 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
विराट कोहलीने 271, तर डेव्हिड वॉर्नरने 273 डावात 9 हजार टी-20 धावा पूर्ण केल्या आहेत.
ADVERTISEMENT