इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये कॅप्टन विराट कोहली आणि रविचंद्रन आश्विनच्या भन्नाट इनिंगच्या जोरावर भारताने आपली आघाडी ३०० पार नेली आहे. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सेशनमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समननी हाराकिरी केली. परंतू यानंतर विराट कोहली आणि आश्विनने मैदानावर तळ ठोकत इंग्लंडच्या नाकीनऊ आणले.
ADVERTISEMENT
पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेणाऱ्या आश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत विराट कोहलीसोबत ९६ रन्सची महत्वपूर्ण पार्टनरशीप केली. यादरम्यान एकाच टेस्टमॅचमध्ये ५० + रन्स आणि ५ विकेट घेणाऱ्या यादीत आश्विनने कपिल देव यांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे.
विराट आणि आश्विनची जोडी इंग्लंडला नाकीनऊ आणत असतानाच मोईन अलीने विराट कोहलीला आऊट करत टीम इंडियाची जमलेली जोडी फोडली. चेपॉकचं पिच स्पिनर्सना चांगलंच मदत करत आहे. टीम इंडियाच्या बॅट्समनना आऊट करण्याच्या चांगल्या संधी इंग्लंडला आल्या होत्या. पण काही सोपे कॅच सोडून इंग्लंडने भारताला जीवदान दिलं. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडला विजयासाठी कितीचं टार्गेट देतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT