Rahmunullah Gurbaz Video : अफगाणिस्तानचा संघाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये कमालीचे प्रदर्शन केले. मात्र या प्रदर्शनानंतरही त्यांना सेमी फायनल गाठता आली नाही. असे असले जरी तरी अफगाणिस्तान संघाने भारतीयांची मन जिंकली आहे. यामाचे कारण ठरला आहे, अफगाणिस्तानचा विकेटकिपर रहमानुल्लाह गुरबाज (Rahmunullah Gurbaz) . रहमानुल्लाह गुरबाजने गोरगरीबांची दिवाळी गोड केली आहे. या संबंधित व्हिडिओही (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (rahmanullah gurbaz viral video afganistan wicket keeper batsman distribute money diwali ahmedabad)
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानचा विकेटकिपर, फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज (Rahmunullah Gurbaz) याने अहमदाबादच्या रस्त्यावर उरतून गरीबांची दिवाळी गोड केली आहे. गुरबाजने रस्त्यावर झोपलेल्या गरिबांच्या जवळ जाऊन त्यांना पैसै वाटले आहेत. जे गरीब झोपले होते त्यांच्या पुढयात त्याने पैसे ठेवले आहे. गुरबाजला या गोष्टीची पब्लिसीटी करायची नव्हती म्हणून तो रात्री 3 वाजचा एकटाच गेला होता.
हे ही वाचा : शारीरिक संबंधाला विरोध केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली हत्या, लोखंडी रॉडने….
गुरबाज जेव्हा या गरीबांजवळ पोहोचला तेव्हा ते सर्व गाढ झोपेत होते. फक्त एकच महिला जागी होती. जी व्हिडिओत गुरबाजच्या मागे फिरताना दिसतेय. यावेळी गुरबाजने झोपलेल्या गरीब लोकांच्या शेजारी 500-500 च्या नोटा ठेवल्या, आणि जागी असलेल्या महिलेच्या हातात पैसे दिले आणि नंतर शांतपणे गाडीतून निघून गेला होता.
यावेळी एका व्यक्तीने गुरबाजला ओळखले आणि त्याला पैसे वाटताना दुरूनच व्हिडीओ बनवला. यानंतर गुरबाज निघून गेल्यावर तो व्यक्ती गरीब लोकांच्या जवळ गेला आणि त्याने पाहिले झोपलेल्यांच्या शेजारी गुरबाजने पैसे ठेवले आहेत. गुरूबाजच्या या मदतीने आता या गरीबांची दिवाळी गोड झाली आहे. तर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
गुरबाजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरबाजला भारतातही खूप पसंत केले जाते. अफगाणिस्तानचा सर्वात लोकप्रिय खेळाडू राशिद खान व्यतिरिक्त, गुरबाज देखील दरवर्षी किमान दोन महिने भारतात येत असतो.तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठीही क्रिकेट खेळला आहे, त्यावेळी अहमदाबाद त्याचे होम ग्राउंड होते. त्यामुळे गुरबाजचे अहमदाबादशीही खास नाते आहे.
ADVERTISEMENT