न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघाला हातातोंडाशी आलेला विजयाचा घास सोडून द्यावा लागला आहे. न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने संपूर्ण षटकं खेळून काढत संघावर आलेला पराभव टाळला. भारताने विजयाची संधी गमावल्यानंतर अनेकांनी दुसऱ्या इनिंगमध्ये डाव घोषित करण्यासाठी झालेल्या उशीराबद्दल नाराजी व्यक्त केली. भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडनेही कानपूरच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
परंतू असं असतानाही राहुल द्रविडने कानपूरच्या ग्राऊंड स्टाफला स्वतःच्या खर्चातून ३५ हजाराचं बक्षीस दिलं आहे. प्रसिद्ध क्रीडा पत्रकार कुशन सरकार यांनी आपल्या ट्विटरवर याबद्दल माहिती दिली आहे.
कानपूरचा कसोटी सामना अखेरच्या दिवशी अखेरच्या तासापर्यंत रंगला. याच कारणासाठी द्रविडने ग्राऊंड स्टाफचं कौतुक करत त्यांना बक्षीस दिल्याचं कळतंय. भारतात गेल्या काही महिन्यांमध्ये कसोटी सामने हे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी संपत होते. अनेकदा माजी परदेशी खेळाडूंनी यासाठी बीसीसीआयवर टीकाही केली होती. अशा परिस्थितीत कानपूरचा सामना अखेरच्या दिवसापर्यंत चालल्यामुळे द्रविडने ग्राऊंड स्टाफचं कौतुक केल्याचं कळतंय.
कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिला असला तरीही माजी खेळाडूंसह फॅन्सनी टेस्ट क्रिकेटचा थरार हाच असतो असं म्हणत दोन्ही संघांचं कौतुक केलं आहे. या मालिकेतला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.
Ind vs NZ : कानपूरच्या खेळपट्टीवर Rahul Dravid नाराज, म्हणाला माझ्या अनुभवातलं हे सर्वात स्लो पिच !
ADVERTISEMENT