राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला दणका, 12 लाखांचा दंड ठोठावला, काय सांगतो IPL चा तो नियम?

Riyan Parag, IPL 2025 Fine : स्लो ओव्हररेटसाठी कॅप्टन परागला हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. रविवारी गुवाहाटीमध्ये सामना खेळला गेला.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Apr 2025 (अपडेटेड: 01 Apr 2025, 11:52 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा 6 धावांनी पराभव

point

राजस्थान रॉयल्सने IPL 2025 मध्ये उघडलं खातं

point

स्लो ओव्हररेटसाठी कॅप्टन परागला 12 लाखांचा दंड

RR skipper Riyan Parag fined Rs 12 lakh: राजस्थान रॉयल्स (RR) ने IPL-2025 च्या 11 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा 6 धावांनी पराभव करून खातं उघडलं. मात्र, दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला दंड ठोठावण्यात आला आहे.

हे वाचलं का?

स्लो ओव्हररेटसाठी कॅप्टन परागला हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. रविवारी गुवाहाटीमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात नितीश राणाच्या 36 चेंडूत 81 धावा केल्या. त्यानंतर लेगस्पिनर वानिंदू हसरंगाच्या 4 विकेट्सच्या जोरावर राजस्थानने हा विजय मिळवला.

हे ही वाचा >> कळंबमधील 'त्या' महिलेचा मृतदेह सापडला, पुरावा संपवला? एकाला अटक, संतोष देशमुख प्रकरणाशी कनेक्शन?

नितीशने 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने रॉयल्सला 9 विकेट्सवर 182 धावांपर्यंत नेलं. 2019 नंतर एकदाही 180 धावांचं लक्ष्य न गाठू शकलेल्या चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा अपयशी ठरले. चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून फक्त 176 धावाच केल्या.

आयपीएलने रियान परागला दंड ठोठावताना अधिकृत निवेदनात म्हटलं होतं की, "राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागवर 30 मार्च 2025 रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान संघाने स्लो ओव्हर रेट कायम ठेवला होता. त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. हा या हंगामातील संघाचा पहिला स्लो ओव्हर रेटशी संबंधित गुन्हा असल्यानं, आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत परागवर 12 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे." 

IPL कडून कशी आहे दंडाची तरतूद? 


पहिला गुन्हा: कर्णधाराला 12 लाख रुपयांचा दंड.

दुसरा गुन्हा: कर्णधाराला 24 लाख रुपये आणि संघातील प्रत्येक खेळाडूला (प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेयर) 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25% रक्कम यापैकी जे कमी असेल तो दंड.

तिसरा गुन्हा: कर्णधाराला 30 लाख रुपये दंड, तर इतर खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50% रक्कम यापैकी जे कमी असेल तो दंड.

हे ही वाचा >> Kunal Kamra : मुंबई पोलीस 'त्या' घरी पोहोचले, कुणाल कामरा म्हणाला, "मी 10 वर्षांपासून..."

दरम्यान, पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून पराभूत झालेल्या RR संघाचा पुढचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. 5 एप्रिलला मुल्लानपूरमध्ये हा सामना पार पडणार आहे.

    follow whatsapp