Ahmednagar : अहमदनगरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका जोडप्याचं लग्न ठरलं होतं. दोघांची एंगेजमेंट झाली नंतर प्री-वेडिंग शूटही करण्यात आलं. मात्र वधूला वर पसंत नसल्यानं तिने एक कट रचला. लग्न करावं लागू नये म्हणून तरूणीने थेट आपल्या होणाऱ्या नवऱ्याला संपवून टाकण्याचा निर्णय घेतला. तरूणीने थेट तरूणाच्या हत्येची सुपारी दिली. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करून पाच आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Beed : कोयत्यानं तरूणावर सपासप वार, उपचारादरम्यान जीव सोडला, मृत्यूआधी आईला म्हणाला आपली जात...
अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडेचं कर्जत तालुक्यातल्या माही जळगावमध्ये राहणाऱ्या सागर जयसिंग कदमशी लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची पूर्ण तयारी केली. दोघांची एंगेजमेंटही झाली आणि प्री-वेडिंग शूटही झालं. सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण दरम्यानच्या काळात मयुरीने तिचा विचार बदलला. सागर कदम आवडत नसल्यानं आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. पण लग्न मोडलं, तर बदनामी होईल, म्हणून तिने एक मोठा कट रचला.
1.50 लाख रुपया दिली हत्येची सुपारी
आरोपी मयुरीने तिचा एक साथीदार संदीप गावडे याला या कटात सहभागी करून घेतलं. दोघांनी मिळून सागर कदमच्या हत्येसाठी 1.50 लाख रुपयांची सुपारी दिली. हत्येच्या या कटामध्ये आणखी काही लोकांचा सहभाग होता. सागर हा कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील रहिवासी आहे. तो एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो. 27 फेब्रुवारीला संध्याककाळी 7.30 वाजता तो कामावरून परत येत होता. तेव्हाच दौंड तालुक्यातील खामगाव फाट्याजवळील यवत पोलीस हद्दीतील एका हॉटेलजवळ काही लोकांनी त्यांला अडवलं. हल्लेखोरांनी सागरवर काठ्यांनी हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली आणि तिथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या सागरने कसा तरी स्वत:चा जीव वाचवला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हे ही वाचा >>उज्ज्वल आणि नीलू Xhams$#*, Strip$@% ला देशी पॉर्न विकून 'एवढे' पैसे कमवायचे, 'इथे' करायचे शूटिंग
पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला. संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे व इतरांची नावं पोलिसांसमोर समोर आली. पोलिसांनी आरोपीला श्रीगोंदा जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. तेव्हा आरोपीने संपूर्ण कट सांगितला. हा सर्व प्रकार मयुरी दांगडेच्या सांगण्यावरून झाल्याचं त्यानं सांगितलं.
पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदित्य शंकर दांगडे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सूरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे यांची नावं आहेत. सर्व आरोपी अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. तसंच या गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. मात्र कटाचा मुख्य मास्टरमाईंड असलेली वधू अद्याप फरार आहे. पोलीस सध्या तीचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
