दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर ३७२ धावांनी मात करत भारताने कसोटी मालिका १-० च्या फरकाने जिंकली. या मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी आपलं वर्चस्व दाखवलं. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या एजाज पटेलने १० विकेट घेत विक्रम रचला खरा, परंतू भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली.
ADVERTISEMENT
हा सामना संपल्यानंतर रविचंद्रन आश्विनने टाकलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. न्यूझीलंडच्या संघातील एजाज पटेल, रचिन रविंद्र आणि भारतीय संघातील अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांना पाठमोरं उभं करत आश्विनने एक फोटो काढला आहे. ज्यात अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा असं दिसत आहे. आश्विनच्या या क्रिएटीव्हीटीचं सध्या सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे.
Ind vs NZ : वानखेडे मैदानावर न्यूझीलंडचा सुपडा साफ, कसोटी मालिका भारताच्या खिशात
रचिन रविंद्र आणि एजाज पटेल हे दोन्ही भारतीय वंशाचे खेळाडू न्यूझीलंडचं प्रतिनिधीत्व करतात. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे रचिन रविंद्रचे आदर्श आहेत. या दोन्ही खेळाडूंवरुनच पालकांनी त्याचं नाव रचिन ठेवलं आहे. तर एजाज पटेल हा मुळचा मुंबईकर असून तो वयाच्या ८ व्या वर्षी आपल्या पालकांसोबत न्यूझीलंडला स्थायिक झाला होता.
तिसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पाच विकेट गमावत १४० धावांपर्यंत मजल मारली होती. चौथ्या दिवशी विजयासाठी पाच विकेट हव्या असताना भारतीय गोलंदाजांनी सुरेख सुरुवात केली. जयंत यादवने रचिन रविंद्र, काएल जेमिन्सन आणि टीम साऊदी या तळातल्या फलंदाजांना झटपट माघारी धाडत न्यूझीलंडच्या उरल्या सुरल्या आव्हानातली हवाच काढून टाकली. रविचंद्रन आश्विनने हेन्री निकोल्सला वृद्धीमान साहाकरवी स्टम्पआऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Ind vs NZ : वानखेडे मैदानावर १० विकेट घेणारा Ajaz Patel आहे मुंबईकर, जाणून घ्या त्याच्याविषयी
ADVERTISEMENT