India vs Australia Indore Test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूर (Indore) कसोटी सामना खेळला जात आहे, पहिल्या दिवशी अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून (Team India) टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. पण कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा निर्णय चुकीचा ठरला, जेव्हा संपूर्ण भारतीय संघ 109 धावांवर बाद झाला.
ADVERTISEMENT
भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. शुभमन गिलने 21 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 20 चा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियन संघाकडून मॅट कुनहानेमनने सर्वाधिक 5 बळी घेतले. तसेच नॅथन लायनला 3 आणि टॉड मर्फीला एक विकेट मिळाली.
Ind Vs Aus : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात; 50 धावात निम्मा संघ तंबूत
टीम इंडियाला पहिल्या डावात लवकर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने 12 धावांवर पहिली विकेट गमावली, परंतु त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन यांनी 96 धावांची भागीदारी करून अडचणी निर्माण केल्या. इथून कांगारूंचा संघ आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असल्याचं दिसत होतं, पण इथून फिरकीपटू रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी करत टीम इंडियाचं पुनरागमन केलं. जडेजाने पहिली विकेट घेतली. यानंतर जडेजाने उर्वरित तीन विकेट्सही घेतल्या. अशाप्रकारे पहिल्या दिवशी चारही विकेट घेत जडेजाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला 156 धावांत रोखले.
अशाप्रकारे कांगारू संघाने पहिल्या डावात भारतावर 47 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज कॅमेरॉन ग्रीन 6 आणि पीटर हँड्सकॉम्ब 7 धावा करून नाबाद आहेत. आता दुसऱ्या दिवशी दोघांचा खेळ सुरू होईल.
Nathan Lyon, IND vs AUS : नॅथन लायन मोडला शेन वॉर्नचा रेकॉर्ड
भारताचे प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, एस. भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग-11: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टी. मर्फी, नॅथन लियॉन, एम. कुनहानेमन
ADVERTISEMENT