रोहित पहिल्यांदाच पूर्णवेळ सांभाळणार वन-डे संघाची कमान; विराटबद्दल केलं महत्वाचं विधान, म्हणाला…

मुंबई तक

• 12:30 PM • 05 Feb 2022

विराट कोहलीची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघामध्ये उद्यापासून नवीन अध्याय लिहीला जाणार आहे. मुंबईकर रोहित शर्माकडे पहिल्यांदाच टी-२० संघासह वन-डे संघाचं कर्णधारपद आलेलं आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहली हा भारताचा आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये विराटने भारताचं यशस्वी […]

Mumbaitak
follow google news

विराट कोहलीची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघामध्ये उद्यापासून नवीन अध्याय लिहीला जाणार आहे. मुंबईकर रोहित शर्माकडे पहिल्यांदाच टी-२० संघासह वन-डे संघाचं कर्णधारपद आलेलं आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे.

हे वाचलं का?

विराट कोहली हा भारताचा आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये विराटने भारताचं यशस्वी नेतृत्वही केलं. परंतू आयसीसी विजेतेपद मिळवण्यात आलेल्या अपयशामुळे विराटला आपलं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा पहिला वन-डे सामना हा भारतासाठी ऐतिहासीक ठरणार आहे. हा सामना भारताचा १ हजारावा वन-डे सामना ठरणार आहे. त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहितने भारतीय संघाच्या तयारीमध्ये आणि विराटकडून मिळणाऱ्या नेतृत्वाबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

Ind vs WI : ठरलं ! ‘हा’ खेळाडू येणार रोहित शर्मासोबत सलामीला

“मला वाटत नाही, आम्हाला फार काही बदल करण्याची गरज आहे. काही ठराविक क्षणांमध्ये आम्हाला आमच्या खेळात बदल करण्याची गरज भासू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीनुसार वेगवेगळा खेळ करणं हे आमचं कामच आहे. मी येऊन काहीतरी गोष्टींमध्ये बदल होईल असं अजिबात नाहीये. खेळाडूंकडून काय अपेक्षित आहे याची कल्पना मी त्यांना नक्की देईन.”

खेळाडूंच्या पाठीशी उभं न राहिल्याने अनिल कुंबळेवर नाराज होता विराट – रत्नाकर शेट्टींचा दावा

वन-डे मध्ये भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ही ७० टक्क्यांच्या घरात आहे. आम्ही काही खेळाडूंशी बोलून काय करणं गरजेचं आहे याबद्दल बोललो आहोत. आमच्या संघाची रचना ही इतर संघांपेक्षा वेगळी आहे. कोणाचे काही वेगळे विचार असतील तर त्यावर नक्कीच चर्चा होईल पण फारकाही बदल करण्याची गरज आहे असं मला वाटत नसल्याचं रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला.

    follow whatsapp