टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनलेल्या सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. २७ मार्चला सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांना याबद्दलची माहिती दिली होती.
ADVERTISEMENT
सचिनला जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्याचे कुटुंबीय मात्र कोरोनापासून सुरक्षित आहेत. सचिन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्या रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दरम्यान सचिन आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात भरती झाला आहे. मी लवकरच घरी येईन तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या असा सल्ला सचिनने आपल्या चाहत्यांना दिला आहे.
सचिन तेंडुलकर हा काही दिवसांपूर्वी रायपूरमध्ये आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. तो इंडिया लिजेंड्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सने चॅम्पियनशीपचा किताब देखील पटकावला होता. दरम्यान, या सीरीजमधील प्रत्येक सामन्याच्या आधी खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. सचिनने याचा व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे सचिन आता लवकर यामधून सावरत परत घरी कधी परततो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT