मुश्ताक अली टी-२०: बडोद्यावर मात करुन तामिळनाडूने पटकावलं विजेतेपद

मुंबई तक

• 04:57 AM • 01 Feb 2021

अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने बडोद्याची झुंज मोडून काढत सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बडोद्याने विजयासाठी दिलेलं १२१ धावांचं टार्गेट तामिळनाडूने ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. बॉलिंगमध्ये तामिळनाडूकडून एम. सिद्धार्थने ४ विकेट घेतल्या. पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या बडोद्याची सुरुवात खराब झाली. अवघ्या ३६ धावांत बडोद्याने आपले ६ बॅट्समन गमावले. […]

Mumbaitak
follow google news

अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने बडोद्याची झुंज मोडून काढत सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बडोद्याने विजयासाठी दिलेलं १२१ धावांचं टार्गेट तामिळनाडूने ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. बॉलिंगमध्ये तामिळनाडूकडून एम. सिद्धार्थने ४ विकेट घेतल्या.

हे वाचलं का?

पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या बडोद्याची सुरुवात खराब झाली. अवघ्या ३६ धावांत बडोद्याने आपले ६ बॅट्समन गमावले. १०० च्या आत हा संघ ऑलआऊट होतो की काय असं वाटत असतानाच अखेरच्या फळीतल्या बॅट्समननी फटकेबाजी करत टीमला १२० धावांचा टप्पा ओलांडून दिला. बडोद्याकडून विष्णू सोळंकीने ४९ रन्स केल्या.

प्रत्युत्तरादाखल तामिळनाडूने सावध सुरुवात केली. बडोद्याच्या बॉलर्सनेही ३ विकेट घेत चांगली झुंज दिली पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. शाहरुख खान आणि बाबा अपराजित यांनी नाबाद खेळी करत तामिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

    follow whatsapp