वयाच्या घोळामुळे शाहीद आफ्रिदी पुन्हा चर्चेत

मुंबई तक

• 09:45 AM • 01 Mar 2021

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन बरीच वर्ष उलटली. परंतू वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आफ्रिदी अजुनही टी-२० लिगमध्ये खेळत आहे. १ मार्च हा शाहिद आफ्रिदीचा वाढदिवस असतो. या दिवशी आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलंय, ज्यात त्याने आपलं वय हे ४४ वर्ष असल्याचं म्हटलं आहे. आफ्रिदीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्या वयावरुन […]

Mumbaitak
follow google news

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन बरीच वर्ष उलटली. परंतू वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आफ्रिदी अजुनही टी-२० लिगमध्ये खेळत आहे. १ मार्च हा शाहिद आफ्रिदीचा वाढदिवस असतो. या दिवशी आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलंय, ज्यात त्याने आपलं वय हे ४४ वर्ष असल्याचं म्हटलं आहे. आफ्रिदीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्या वयावरुन पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात आपलं वय हे ४६ वर्ष असं लिहीलं आहे. तर क्रिकेटचे सामने कव्हर करणाऱ्या काही वेबसाईटवर आफ्रिदीचं वय हे ४०-४१ वर्ष दाखवलं जातंय. त्यामुळे आफ्रिदीचं वय नेमकं आहे तरी किती यावरुन सोशल मीडियावर फॅन्स त्याला पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत.

गेम चेंजर या आपल्या आत्मचरित्रात शाहिद आफ्रिदीने आपल्या वयाबद्दलचा खुलासा केला आहे. यात आफ्रिदीने असं म्हटलंय की कागदपत्रात दाखवलेल्या वयापेक्षा आपलं वय हे अधिक आहे. दोन्ही तारखांमध्ये ५ वर्षांचा फरक असल्याचंही आफ्रिदी म्हणाला होता. आफ्रिदीच्या या खुलाश्यानंतर वादही झाला होता.

आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार तो आज ४४ वर्षांचा झाला असेल तर त्याचा जन्म हा १९७७ साली झाला असला पाहिजे. परंतू विकीपीडीया व अन्य वेबसाईटवर आफ्रिदीचं जन्मसाल हे वेगळं दाखवत असल्यामुळे गोंधळ आणखी वाढला आहे. शाहीद आफ्रिदीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवा शतकवीराचा विक्रम जमा आहे. १९९६ साली आफ्रिदीने श्रीलंकेविरुद्ध ३७ बॉलमध्ये १०० धावा चोपल्या होत्या. जुन्या रेकॉर्डनुसार आफ्रिदीचं वय त्यावेळी १६ वर्ष २१७ दिवंस एवढं होतं. परंतू आफ्रिदीने आज केलेल्या ट्विटमुळे त्याचं वय हे १९९६ साली १९ वर्ष २१७ दिवस असायला हवं असा दावा केला जात आहे. त्यामुळे वन-डे क्रिकेटमध्ये युवा शतकवीराचा विक्रम आता आफ्रिदीच्या नावावरुन अफगाणिस्तानच्या उसमान घानीच्या नावावर व्हायला हवा असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

    follow whatsapp