भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये क्वीन्सलँडमध्ये सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात सांगलीकर स्मृती मंधानाने तडाखेबंद शतक झळकावत इतिहास रचला. स्मृतीच्या या शतकी खेळीचं प्रचंड कौतुक होत आहे. पण, तिच्या खेळीनंतर क्रिकेटपटू हरलीन देओलनं केलेल्या ट्वीट आणि अॅलेक्साकडे केलेल्या फर्माईशची चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
पिंक बॉल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मृती मंधानाने 170 चेंडू खेळत शतक साकारलं. 18 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने स्मृतीने ही खेळी केली. महत्त्वाचं म्हणजे स्मृतीने चौकार लगावत आपली शतकी खेळी पूर्ण केली. या शतकाबरोबरच स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
स्मृतीच्या या शतकी खेळीनंतर क्रिकेटपटून हरलीन देओलने एक ट्वीट केलं. ज्यात स्मृतीचा शतक झळकावल्यानंतरचा फोटो पोस्ट केला. या फोटोला कॅप्शन देत तिने अॅलेक्साकडे एक गाणं प्ले करण्याची फर्माईशही केली. ‘अॅलेक्सा प्लीज प्ले ओ हसीना झुल्फो वाली’ असं म्हटलं.
हरलीनच्या या ट्वीटला स्मृती मंधानानेही रिप्लाय दिला. तिने हरलीनचं ट्वीट रिट्विट करत म्हणाली, ‘अॅलेक्सा प्लीज हरलीन देओलला म्यूट कर’, असं म्हणत मजेशीर उत्तर दिलं.
स्मृतीच्या शतकानंतर सांगलीत जल्लोष…
स्मृती मंधानानं पिंक बॉल कसोटी सामन्यात झळकावलेल्या शतकानंतर सांगलीकरांनी जल्लोष केल्याचं बघायला मिळालं. मंधानाने 52 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅलिस पॅरीला चौका लगावला आणि शतक पूर्ण केलं. त्यानंतर सांगलीतील स्मृती कॅफेसमोर सांगलीकरांनी आणि तिच्या कुटुंबियांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
ADVERTISEMENT