Ind vs NZ : कसोटी मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाला धक्का, लोकेश राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर

मुंबई तक

• 11:21 AM • 23 Nov 2021

न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ३-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. परंतू पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर मुंबईकर सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यातही लोकेश राहुल खेळू […]

Mumbaitak
follow google news

न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ३-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. परंतू पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.

हे वाचलं का?

त्याच्या जागेवर मुंबईकर सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यातही लोकेश राहुल खेळू शकला नव्हता. लोकेश राहुल आता बंगळुरुला जाऊन NCA मध्ये स्वतःचा फिटनेस सुधारण्याकडे लक्ष देणार आहे. आगामी महिन्यातील दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी लोकेश राहुल स्वतःला तयार करणार आहे.

२५ नोव्हेंबरपासून कानपूरच्या मैदानावर पहिला तर ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Ind vs NZ Test : वानखेडे मैदानावर प्रेक्षकांना १०० टक्के एन्ट्री, राज्य सरकारची परवानगी

पहिल्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारताचा संघ –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), के.एस.भारत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

Ind vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश, ७३ रन्सनी जिंकला अखेरचा टी-२० सामना

    follow whatsapp