T20 विश्वचषक 2022 मध्ये गट-1 चं चित्र स्पष्ट झालं आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. यासह सध्याचा चॅम्पियन आणि यजमान ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
ADVERTISEMENT
ग्रुप 1 मधून उपांत्य फेरी गाठणारे संघ
न्यूझीलंड – 5 सामने, 3 विजय, 1 पराभव, 1 अनिर्णित, 7 गुण, +2.113 नेट्रेट
इंग्लंड – 5 सामने, 3 विजय, 1 पराभव, 1 अनिर्णित, 7 गुण, +0.473 नेट्रेट
इंग्लंडचा डाव
पहिली विकेट – जोस बटलर (28) 75/1 7.2 षटके
दुसरी विकेट – अॅलेक्स हेल्स (47) 82/2 9.1 षटके
तिसरी विकेट – हॅरी ब्रूक (4) 93/3 10.6 षटके
चौथी विकेट – लियाम लिव्हिंगस्टोन (4) 106/4 13.1 षटके
पाचवी विकेट – मोईन अली (1) 111/5 14.3 षटके सहावी विकेट – सॅम कुरन (6) 129/6 17.6 षटके
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 141 धावा केल्या. संघाच्या वतीने सलामीवीर पथुम निसांकाने 67 धावांची धडाकेबाज खेळी केली, शेवटी भानुका राजपक्षेने 22 धावांची खेळी केली. एकवेळ श्रीलंका मोठ्या धावसंख्येपर्यंत जाऊ शकेल असे वाटत होते, पण यावेळी मधल्या फळीने चकवा दिला. अशा स्थितीत श्रीलंकेला 20 षटकांत केवळ 141 धावा करता आल्या. इंग्लडने हा लक्ष्य सहज गाठत विजय मिळवला.
न्यूझीलंडच्या संघाला नेट रनरेटचा फायदा
सुपर-12 मध्ये ग्रुप-1 मध्ये आज (5 नोव्हेंबर) सिडनी येथे इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार झाला. इंग्लंडसाठी उपांत्य फेरी गाठण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक होतं. जर इंग्लंड जिंकला तर ऑस्ट्रेलिया बाद होईल. जर श्रीलंकेने हा सामना जिंकला असता तर लंकन टीम आणि इंग्लंड दोघेही बाद झाले असते आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी पात्र ठरला असता.
ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोघांचे 7 पॉईंट होते. मात्र नेट रनरेट न्यूझीलंडचा जास्त होता. त्यामुळं न्यूझीलंड सेमीफायनलसाठी पात्र ठरली. आता भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवला तर सेमीफायमलमध्ये इंग्लडशी त्याचा सामना होईल.
ADVERTISEMENT