युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी संघाची घोषणा केली. संघाची घोषणा करताना जय शहा यांनी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार असल्याचं सांगितलं आणि सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
ADVERTISEMENT
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर धोनीची टीम इंडियाशी निगडीत ही पहिलीच कामगिरी असणार आहे. धोनीला मेंटॉर म्हणून नेमण्यात सचिव जय शहा यांनी मोलाची भूमिका बजावल्याचं कळतंय.
‘टीमचा चाणक्य ड्रेसिंग रुममध्ये’! T-20 World Cup साठी धोनी संघाचा मेंटॉर, सोशल मीडियावर फॅन्स आनंदात
ज्यावेळी धोनीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळी त्याने यात आपला रस दाखवला. टी-२० वर्ल्डकपसारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी धोनीने ही जबाबदारी स्विकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल बीसीसीआय त्याचं आभारी असल्याचंही जय शहा म्हणाले. परंतू धोनीची ही नेमणूक फक्त एका वर्षभरासाठी करण्यात आल्याचंही जय शहा यांनी स्पष्ट केलं.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, टी-२० विश्वचषकासाठी धोनीच्या अनुभवाचा वापर करुन घेण्याची कल्पना जय शहा यांना सुचली. ज्यानंतर शहा यांनी धोनीसोबत व्हर्च्युअल मिटींग करत त्याला बीसीसीआयचा प्रस्ताव सांगितला. यानंतर याविषयी चर्चा झाल्यानंतर धोनीने बीसीसीआयचा प्रस्ताव मान्य केला. यानंतर जय शहा यांनी कॅप्टन विराट कोहली आणि व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा यांच्याशीही संवाद साधत त्यांना याविषयी माहिती दिली. ज्याला दोघांनीही तात्काळ आपला होकार कळवल्याचं समजतंय.
यानंतर जय शहा यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना धोनीच्या नेमणूकीबद्दल माहिती दिली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची ही शेवटची जबाबदारी असणार आहे. रवी शास्त्री यांनीही धोनीच्या नेमणुकीबद्दल आनंद व्यक्त केला असून त्याच्या नेमणूकीचा संघाला फायदाच होईल असंही रवी शास्त्री म्हणाले.
T-20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, रविचंद्रन आश्विन-भुवनेश्वर संघात परतले
ADVERTISEMENT