WTC Points Table: मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडचा तिसरा कसोटी सामना रंगला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंडने 3-0 ने आघाडी घेत ही कसोटी मालिका खिशात घातली. या सामन्यात भारताला चौथ्या इनिंगमध्ये 147 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. परंतु, भारताचे सर्व फलंदाज फक्त 121 धावांवर गारद झाले. भारताला या पराभवाचा मोठा धक्का बसला असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे.
ADVERTISEMENT
या मालिकेत पराभव झाल्याने भारताची डब्लूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानवर घसरण झाली आहे. आता ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्यामुळे भारताला चॅम्पियनशिपचं फायनल तिकीट मिळेल की नाही? असा प्रश्न सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. न्यूझीलंड विरोधात झालेली कसोटी मालिका गमावल्याने भारताने डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गमावलं आहे.
हे ही वाचा >> Ind vs Nz 3rd Test: पराभवाचं खापर कुणावर फोडलं? रोहित शर्माच्या प्रतिक्रियेनं खळबळ; म्हणाला, "कर्णधार म्हणून..."
आता ऑस्ट्रेलियाने पहिल्या नंबरवर उडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियनशिपमध्ये 12 कसोटी सामन्यात 8 विजय, 3 पराभव आणि 1 ड्रॉ सामन्यामुळे 90 पॉईंट्स मिळवून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर बाजी मारली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता 62.50 टक्के झाली आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. आता भारताचे 14 टेस्टमध्ये 8 विजय, 5 पराभव आणि एका ड्रॉ सामन्यामुळे 98 पॉईंट्स आहेत. भारताची विजयाची शक्यता 62.50 टक्के आहे.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं 'दिवाळी गिफ्ट'! उपमुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत केली मोठी घोषणा
WTC फायनलसाठी करावं लागेल 'हे' काम
न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने पराभव केल्यानंतर आता भारताला फायनलचं तिकीट मिळवणं जवळपास अशक्य झालं आहे. आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या शेवटच्या पाच टेस्ट सामन्यांमध्ये विजयी मिळवावा लागेल. तसच भारताला इतर कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या निकालावरही अवलंबून राहावं लागेल.
ADVERTISEMENT