ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली आश्वासक खेळ करत बॉर्डर – गावसकर ट्रॉफी जिंकली. प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत आणि दुखापतींचं सत्र अशा दुहेरी संकटाचा सामना करुन अजिंक्यसेनेने ऑस्ट्रेलियात यश संपादन केलं. भारतीय संघाच्या या विजयानंतर सोशल मीडियावर साहजिकच अजिंक्य रहाणेला कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवण्याची मागणी होऊ लागली.
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन लीने अजिंक्य रहाणेचं कौतुक करताना टीम इंडिया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली अधिक चांगली कामगिरी करते असं म्हटलं आहे. “अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडिया अधिक रिलॅक्स असते. जर मी भारतीय संघाच्या निवड समितीवर असतो, मी नाहीये याची मला कल्पना आहे. पण मी त्या जागेवर असतो तर मी अजिंक्य रहाणेला कॅप्टन केलं असतं आणि विराट कोहलीला त्याला त्याच्या बॅटींगवर फोकस करायला सांगितलं असतं.” शेन ली Afternoon Sports च्या पॉडकास्टमध्ये बोलत होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टीम इंडियाचे सर्व महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे त्रस्त होते. पण अशा परिस्थितीतही अजिंक्यने युवा खेळाडूंना सोबत घेऊन भारताला विजय मिळवून दिला.
ADVERTISEMENT