चीनमधल्या एका बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेली चायनिज टेनिसपटू पेंग शुआई गायब झाली आहे. ती कुठे गायब झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने ती लवकरच समोर येईल आणि ती सुरक्षित आहे असं वृत्त दिलं आहे. शनिवारी ग्लोबल टाइम्सने एक वृत्त दिलं होतं ज्यामध्ये हे सांगण्यात आलं होतं की ती पूर्णतः सुरक्षित आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
चीनची टेनिसपटू पेंग शुआईने चीनचे माजी उप पंतप्रधान झांग गाओली यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 2 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. मात्र त्यानंतर ही खेळाडू गायब झाल्याने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जाते आहे. एक चायनिज टेनिसपटू अशा प्रकारे गायब झाल्याने चीनमध्ये दहशतीचं वातावरण आहे. जागतिक दुहेरी क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू पेंग पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत चीनमध्ये महिलांच्या टेनिस स्पर्धा होणार नसल्याचे ‘डब्ल्यूटीए’चे अध्यक्ष स्टिव्ह सायमन यांनी सांगितले आहे.
पेंग सुरक्षित असून बीजिंगमध्ये असल्याचे चिनी टेनिस संघटनेने ‘डब्ल्यूटीए’ला कळवले आहे. मात्र, आमची खात्री पटलेली नसून तिच्याशी थेट संपर्क झाला नसल्याचे सायमन यांनी म्हटले आहे. ‘मला पेंगविषयी खूप चिंता वाटत आहे.’ असं सायमन यांनी म्हटलं आ
ADVERTISEMENT