U-19 विश्वचषक विजेता कर्णधार, रणजी पदार्पणात शतक; युवा यश धुल चमकला

मुंबई तक

• 08:56 AM • 17 Feb 2022

वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या यश धुलसाठी सध्याचा काळ अत्यंत चांगला जाताना दिसत आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने यश वर चांगली बोली लावून त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं. यानंतर दिल्लीकडून आपला रणजी स्पर्धेचा पहिला सामना खेळताना यश धुलने धडाकेबाज शतकी खेळी केली आहे. गुवाहटी येथे तामिळनाडूविरुद्धच्या […]

Mumbaitak
follow google news

वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या यश धुलसाठी सध्याचा काळ अत्यंत चांगला जाताना दिसत आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने यश वर चांगली बोली लावून त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं. यानंतर दिल्लीकडून आपला रणजी स्पर्धेचा पहिला सामना खेळताना यश धुलने धडाकेबाज शतकी खेळी केली आहे.

हे वाचलं का?

गुवाहटी येथे तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात यश धुलने ही कामगिरी करुन दाखवली आहे. तामिळनाडूने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीची सुरुवात खराब झाली. यश धुलसोबत सलामीला आलेला ध्रुव शौरी स्वस्तात माघारी परतला. यानंतर हिम्मत सिंगही भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर यश धुलने नितीश राणा आणि जाँटी सिद्धुसोबत दिल्लीचा डाव सावरला.

यश धुलने जाँटी सिद्धुसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तामिळनाडूच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत यशने काही सुरेख फटके खेळले. १५० चेंडूत १८ चौकारांसह ११३ धावा केल्यानंतर यश धुल मोहम्मदच्या बॉलिंगवर आऊट झाला. परंतू आपल्या शतकी खेळीच्या जोरावर यशने दिल्लीच्या संघाची बाजू भक्कम करुन दिली. या खेळीमुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान यशला कोरोनाची लागण झाल्यामुळे दोन सामने खेळता आलेले नव्हते. परंतू यावर मात करुन यशने संघात पुनरागमन केलं. इतकच नव्हे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य पेरीत्या सामन्यात यशने शतकही झळकावलं. यानंतर रणजी करंडक स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे यश धुल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

    follow whatsapp